तब्बल ३०० वर्षांची परंपरा; कीर्तन, प्रवचनात वारकरी तल्लीन

By Admin | Updated: July 8, 2014 00:33 IST2014-07-08T00:20:46+5:302014-07-08T00:33:39+5:30

पाथरी : अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोकी, जायन जे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या, असे अभंग आळवीत देहू ते पंढरपुरी तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये वारकरी दंग झाल्याचे

300 years old tradition; Kirtan, the discourse, Warkari delve | तब्बल ३०० वर्षांची परंपरा; कीर्तन, प्रवचनात वारकरी तल्लीन

तब्बल ३०० वर्षांची परंपरा; कीर्तन, प्रवचनात वारकरी तल्लीन

पाथरी : अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोकी, जायन जे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या, असे अभंग आळवीत देहू ते पंढरपुरी तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये वारकरी दंग झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. भारतबुवा कानसूरकर यांच्या पायीदिंडीची ३०० वर्षांची परंपरा आहे.
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी एकादशीची वारी संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील कानसूर येथील भारतबुवा महाराज कानसूरकर यांच्या पायी दिंडीला मानाचे स्थान आहे. मुख्य पालखीचे विणेकरी आणि चोपदार म्हणून कानसूर येथील दिंडीतील वारकऱ्यांना सेवा करण्याचा मान दरवर्षी मिळतो. ७ जुलै रोजी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत कानसूरच्या पायी दिंडीमध्ये सदर प्रतिनिधीने तिराची कुरोली ते वखारीपर्यंत दिंडीमध्ये सहभाग घेतला. पूर्वजापासून त्यांच्या पायीदिंडीचा सोहळा आजतागायत सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कानसूरच्या पायी दिंडीचे प्रस्थान १७ जून रोजी पाथरी येथून देहू येथे झाले आणि देहू येथून १९ जूनपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही पायीदिंडी पालखी समवेत आहे. तुकाराम महाराजांच्या मुख्य पालखीच्या रथासमोर दुसऱ्या क्रमांकाची दिंडी म्हणून या दिंडीला मान आहे. ७ जुलै रोजी तुकाराम महाराजांची पालखी वखारी येथे मुक्कामी येते. ह.भ.प. भारतबुवा कानसूरकर म्हणाले, पालखीचा अनुभव सर्वच वारकऱ्यांना जीवनाचे सार सांगून जातो. ज्या सुखा कारने देव वेढावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, तोच सुख सोहळा आणि पंढरी हेच देवाचे सदन म्हणून वारकरी या वारीमध्ये बेधुंद रमून जातात. या ठिकाणचा रिंगण सोहळा, फुगड्या, भारुडे, कीर्तन, प्रवचनानंतर आपापल्या फडात राहुट्यामध्ये वारकरी विश्रांती घेताना दिसून येतात. तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील अश्व तीन ठिकाणी गोल रिंगण करतो. या अश्वाने यावर्षी २९ जून रोजी सेलवडी, १ जुलै रोजी इंदापूर आणि ४ जुलै रोजी सराटी या ठिकाणी गोल रिंगणामध्ये सहभाग घेतला. बाभळगावच्या या अश्वाचा मान गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. ७ जुलै रोजी पायी दिंडीसमवेत जि़ प़ च्या सभापती चंद्रकला सुभाषराव कोल्हे, सुभाषराव कोल्हे, शंतनू पाटील, उद्धवराव शिंदे यांच्यासह कानसूर, उमरा गुंज, गौंडगाव, वाघाळ, खदगाव, अंधापुरी, तारुगव्हाण, डिग्रस, सुरुमगाव, मसला, लिंबगाव, जळगव्हाण येथील वारकऱ्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
पायीदिंडीतील अनुभव सांगताना ह.भ.प. भारतबुवा कानसूरकर म्हणाले की, सकाळी उठल्यापासून रात्री मुक्कामापर्यंत दिनचर्या ठरलेली असते. वारकरी स्रान करुन धर्मग्रंथ गाथा पारायण ज्ञानेश्वरी पठण करतात. दररोज तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ सजवतात. सजविलेल्या पालखी रथात पादुका ठेवतात आणि दुसऱ्या कामाला जाण्यासाठी पुन्हा तयार असतात. टाळकरी-विणेकरी पताका घेऊन दिंड्या काढू लागतात.

Web Title: 300 years old tradition; Kirtan, the discourse, Warkari delve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.