शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाला ३० कर्मचाऱ्यांची दांडी

By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेतर्फे रविवारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेतर्फे रविवारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला दीडशेपैकी १२० कर्मचारी उपस्थित राहिले. उर्वरित ३० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली. हे प्रशिक्षण मतपत्रिका आणि मतपेट्या समोर ठेवूनच देण्यात आले. त्यामुळे छावणीची निवडणूक मतदान यंत्रांऐवजी जुन्या पद्धतीने, म्हणजे मतपत्रिकेवरील चिन्हांवर फुली मारूनच होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. छावणी परिषदेसाठी ११ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण आज छावणी परिषदेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी १५० कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते; पण प्रत्यक्षात १२० कर्मचारीच हजर राहिले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर किती वाजता जायचे, काय करायचे, कोणत्या बोटावर शाई लावायची, कुणी आक्षेप घेतल्यास काय करायचे, रजिस्टरमध्ये कोणत्या नोंदी घ्यायच्या आदींविषयी निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी अडकुणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आनंद बोबडे, नायब तहसीलदार एस. जी. पोटे आदींची उपस्थिती होती. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. तसेच या मतपेट्या कशा सील करायच्या, मतपत्रिका कशा असतील, त्या फोल्ड कशा करायच्या या विषयीचीही माहिती देण्यात आली. त्यामुळे आता छावणीची निवडणूक जुन्याच पद्धतीने होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. छावणीच्या आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत मतपेट्या आणि मतपत्रिकांचाच वापर करण्यात आलेला आहे. २००८ सालची निवडणूकही अशाच पद्धतीने घेण्यात आली; पण अलीकडच्या काळात सर्वच निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होऊ लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवून छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचा वापर करण्याची परवानगी मागितली होती; परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यास नकार दिला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडेही असाच प्रस्ताव सादर केला; परंतु त्यावर अद्याप आयोगाने काहीही कळविलेले नाही.