आपद्ग्रस्तांना ३० हजार ५०० रूपयांची मदत

By Admin | Updated: September 11, 2014 01:08 IST2014-09-11T00:45:52+5:302014-09-11T01:08:04+5:30

लातूर : जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माळीण दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी अर्ध्या तासाभरात ३० हजार ५०० रूपयांचा निधी जमा केला असून,

30 thousand 500 rupees for the victims | आपद्ग्रस्तांना ३० हजार ५०० रूपयांची मदत

आपद्ग्रस्तांना ३० हजार ५०० रूपयांची मदत


लातूर : जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माळीण दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी अर्ध्या तासाभरात ३० हजार ५०० रूपयांचा निधी जमा केला असून, तो निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठविण्यात आला आहे़
माळीण दुर्घटनेत अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत़ त्यामुळे या आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती कल्याण पाटील, जि़प़सदस्य किशनराव लोमटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, कक्ष अधिकारी ए़ए़शेख यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. कर्मचाऱ्यांनीही आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी अर्ध्या तासामध्ये ३० हजार ५०० रूपयांचा निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्यामार्फत आपद्ग्रस्तांना पाठविण्यात आला़
यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सढळ हाताने मदत केल्याबद्दल जि़प़अध्यक्ष दत्तत्रय बनसोडे गुरूजी यांनी समाधान व्यक्त केले़ (प्रतिनिधी)

Web Title: 30 thousand 500 rupees for the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.