शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

३ हजारांवर झाले प्रवेश

By admin | Updated: July 12, 2014 00:35 IST

कंधार : तालुक्यात जि़प़ शाळांची संख्या १८९ आहे़ विद्याविषयक वर्षे २०१४-२०१५ मध्ये पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात आला़

कंधार : तालुक्यात जि़प़ शाळांची संख्या १८९ आहे़ विद्याविषयक वर्षे २०१४-२०१५ मध्ये पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात आला़ इयत्ता पहिलीसाठी दाखलपात्र विद्यार्थीसंख्या ३ हजार २८७ असताना प्रत्यक्ष प्रवेश ३ हजार ३१७ विद्यार्थ्यांचा झाला़ विशेष म्हणजे, ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य ६ विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यात यश मिळविल्याचे समोर आले आहे़१६ जूनपासून शाळा सुरू झाल्या़ परंंतु शाळा प्रारंभापूर्वी १४ व १५ जूनला विविध बाबींवर लक्ष देण्यात आले़ गाव-वार्डनिहाय ६ ते १४ वयोगटातील दाखलपात्र व शाळाबाह्य अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून शाळा व गावच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्यात आली़ शाळा वर्गखोल्या, परिसर, नामफलक, सूचना फलक, वर्ग फलक, पिण्याचे पाणी आदी स्वच्छ करण्यात आले़ शाळा दाखलपात्र व नियमित दाखल असलेल्या मुला-मुलींना शाळेत दाखल होण्याचे प्रयत्न करण्यात आले़ तालुक्यात जि़प़ शाळा मोठ्या प्रमाणात आहेत़ त्यात १७ केंद्रांतर्गत इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थीसंख्या ३ हजार २८७ होती़ कंधार केंद्रांतर्गत १८९ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला़ पानभोसी केंद्रांतर्गत १७५, बहाद्दरपुरा-१७९, शेकापूर-१४३, रूई-२३८, दिग्रस बु-२२४, कुरुळा-३१२, बोळका-१८८, बारूळ-२६६, कौठा-१५९, गोणार-२२५, मंगलसांगवी-१५१, चिखली-२००, शिराढोण-१९७, उस्माननगर-१३३ अशी विद्यार्थीसंख्या आहे़ फुलवळ केंद्रांतर्गत मात्र पहिलीत दाखलपात्र विद्यार्थीसंख्या १७३ असताना प्रत्यक्ष दाखल १९९ झाले़ तसेच आंबुलगा केंद्रात १४२ दाखलपात्र असताना १४५ दाखल झाले़ त्यामुळे एकूण ३ हजार ३१७ पहिलीत दाखल विद्यार्थीसंख्या झाली़ ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य वयानुरूप रूई केंद्रांतर्गत १ मुलगा, बारूळ केंद्रांतर्गत ४ मुले व एक मुलगी अशा ६ विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यात आले़ एकूण प्रवेशदाखल विद्यार्थीसंख्या ३ हजार ३२३ झाली़ काहींनी जवळच्याच केंद्रांतर्गत शाळेत प्रवेश घेतला़ काही आपल्या नातेवाईक यांच्याकडे शिक्षणासाठीही आले़ (वार्ताहर)बहाद्दरपुरा केंद्रांतर्गत शाळेत पहिलीत ८६ मुले दाखल झाली़ परंतु मुली ९३ दाखल झाल्या़ शेकापूर केंद्रांतर्गत ७१ मुले व ७२ मुली, रूई ११८ मुले व ११९ मुली, बोळका-९१ मुले व ९७ मुली, गोणार १०७ मुले व ११८ मुली, मंगलसांगवी ६७ मुले व ८४ मुली व उस्माननगर केंद्रांतर्गत ५७ मुले व ७६ मुलींचा प्रवेश झाला़ पहिलीत १७३५ मुले व १५८२ मुलींचा प्रवेश झाला़