शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईसाठी ३ कोटी

By admin | Updated: May 12, 2014 00:39 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीनिमित्त करण्यात येणार्‍या नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने शुक्रवारी निविदा काढल्या आहेत.

 औरंगाबाद : महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीनिमित्त करण्यात येणार्‍या नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने शुक्रवारी निविदा काढल्या आहेत. मान्सूनपूर्वी नालेसफाई होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, पालिकेतील अनेक साहेब रजेवर असल्यामुळे सफाईचा विषय काढण्यास कुणीही तयार नसल्याचे वृत्त लोकमतने ७ मेच्या अंकामध्ये प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत प्रशासनने ८ मे रोजी निविदा काढल्या आहेत. येत्या आठवड्यात नालेसफाईचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मनपासमोर नालेसफाईचे मोठे आव्हान उभे राहते. शहरात ६६ कि़मी. लांबीचे नाले आहेत. नाल्यामधील गाळ, कचरा व अतिक्रमणे तशीच आहेत. मान्सून महिन्यावर आला आहे. अजूनही पालिकेने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. सत्ताधारी निवडणूक रणधुमाळीच्या थक व्यातच आहेत, तर अधिकारी सुट्यांवर गेले आहेत. ६२ नाल्याची लांबी शहरातील ६२ नाल्यांची लांबी ६६ कि़मी. इतकी आहे. त्या नाल्यांच्या सफाईसाठी ३ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. निविदा प्रशासनाने काढल्या आहेत. नाल्यांवर २ हजार अतिक्रमणे शहरातील मनपा हद्दीतील नाल्यांवर २ हजार अतिक्रमणे आहेत. मनपाने २० लाख रुपये खर्चून नाल्यांचे नकाशे तयार करून अतिक्रमणांचा शोध घेतला. ४मात्र, पालिकेने ते काम कागदोपत्रीच केल्याचा आरोप झाल्यामुळे मोहीम थंडावली. साडेचार लाख प्रति कि़मी. खर्च या वर्षी नालेसफाईचा प्रति किलोमीटरचा खर्च ४ लाख ५४ हजारांच्या घरात जाणार आहे. पावसाने नाले साफ होतील या आशेवरच प्रशासन असते. गांधीनगर, दिवाणदेवडी, दलालवाडी, कटकटगेट, औरंगपुरा, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, उल्कानगरी या भागातील नाल्याची परिस्थिती पावसाळ्यात अतिशय बिकट होते. कार्यकारी अभियंता म्हणाले... सहा प्रभागांची जबाबदारी तीन कार्यकारी अभियंत्यांवर आहे. प्रभागनिहाय नालेसफाईच्या निविदा निघाल्या आहेत. लवकरात लवकर ती कामे सुरू होतील, असा दावा ‘ड’ व ‘अ’ प्रभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.