नालेसफाईसाठी ३ कोटी
By Admin | Updated: May 12, 2014 00:39 IST2014-05-12T00:22:39+5:302014-05-12T00:39:26+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीनिमित्त करण्यात येणार्या नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने शुक्रवारी निविदा काढल्या आहेत.

नालेसफाईसाठी ३ कोटी
औरंगाबाद : महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीनिमित्त करण्यात येणार्या नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने शुक्रवारी निविदा काढल्या आहेत. मान्सूनपूर्वी नालेसफाई होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, पालिकेतील अनेक साहेब रजेवर असल्यामुळे सफाईचा विषय काढण्यास कुणीही तयार नसल्याचे वृत्त लोकमतने ७ मेच्या अंकामध्ये प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत प्रशासनने ८ मे रोजी निविदा काढल्या आहेत. येत्या आठवड्यात नालेसफाईचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मनपासमोर नालेसफाईचे मोठे आव्हान उभे राहते. शहरात ६६ कि़मी. लांबीचे नाले आहेत. नाल्यामधील गाळ, कचरा व अतिक्रमणे तशीच आहेत. मान्सून महिन्यावर आला आहे. अजूनही पालिकेने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. सत्ताधारी निवडणूक रणधुमाळीच्या थक व्यातच आहेत, तर अधिकारी सुट्यांवर गेले आहेत. ६२ नाल्याची लांबी शहरातील ६२ नाल्यांची लांबी ६६ कि़मी. इतकी आहे. त्या नाल्यांच्या सफाईसाठी ३ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. निविदा प्रशासनाने काढल्या आहेत. नाल्यांवर २ हजार अतिक्रमणे शहरातील मनपा हद्दीतील नाल्यांवर २ हजार अतिक्रमणे आहेत. मनपाने २० लाख रुपये खर्चून नाल्यांचे नकाशे तयार करून अतिक्रमणांचा शोध घेतला. ४मात्र, पालिकेने ते काम कागदोपत्रीच केल्याचा आरोप झाल्यामुळे मोहीम थंडावली. साडेचार लाख प्रति कि़मी. खर्च या वर्षी नालेसफाईचा प्रति किलोमीटरचा खर्च ४ लाख ५४ हजारांच्या घरात जाणार आहे. पावसाने नाले साफ होतील या आशेवरच प्रशासन असते. गांधीनगर, दिवाणदेवडी, दलालवाडी, कटकटगेट, औरंगपुरा, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, उल्कानगरी या भागातील नाल्याची परिस्थिती पावसाळ्यात अतिशय बिकट होते. कार्यकारी अभियंता म्हणाले... सहा प्रभागांची जबाबदारी तीन कार्यकारी अभियंत्यांवर आहे. प्रभागनिहाय नालेसफाईच्या निविदा निघाल्या आहेत. लवकरात लवकर ती कामे सुरू होतील, असा दावा ‘ड’ व ‘अ’ प्रभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.