२९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

By Admin | Updated: July 4, 2014 00:20 IST2014-07-03T23:57:35+5:302014-07-04T00:20:00+5:30

अशोक अनगुलवार , हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावात ९७ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ११ हेक्टर जमीन पुन्हा संपादन करण्यात आली. दरेसरसम तलाव कोंडला तर २९४ हेक्टर पाण्याखाली येऊ शकते.

294 hectares of land will come under water | २९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

२९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

अशोक अनगुलवार , हिमायतनगर
तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावात ९७ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ११ हेक्टर जमीन पुन्हा संपादन करण्यात आली. दरेसरसम तलाव कोंडला तर २९४ हेक्टर पाण्याखाली येऊ शकते.
२००७ मध्ये शेतकऱ्यांच्या १०७ हे. जमीनीचा मावेजा ८० टक्के २०११ मध्ये मिळाला. नवीन रेटप्रमाणे शेतकऱ्यांना दीड कोटीचा डिफरन्स मिळणार असल्याचे अधीक्षक अभियंता कुरुडे यांनी सांगितले. दरेसरसम साठवण तलावात दरेसरसम, आंदेगाव, पवना येथील जमिनी गेल्या आहेत. या साठवण तलावावर लिफ्ट इरिगेशन केल्यास २९४ हे. जमीन पाण्याखाली येणार आहे. परंतु शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा न मिळाल्याने गेल्या ५ वर्षापासून हा साठवण तलाव कोंडण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. पोट भरण्याचा जमिनीचा तुकडाच दरेसरसम साठवण तलावात गेल्याने व २००७ च्या रेटप्रमाणे मिळणारा मावेजा २०११ मध्ये देत असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यावर हिमायतनगर तालुक्यात सुना, पवना, पोट, दुधड पिचोंडी हे तलाव असून सुना, पवना, दुधड, पोटा तलावामुळे त्या त्या भागात सिंचनाची व्यवस्था झाली. खरीप, रब्बी, बारमाही पीक शेतकरी घेत आहे. तालुक्यात पैनगंगा नदी असल्याने नदीकाठच्या १५ ते २० गावाला त्याचा लाभ मिळत आहे. पैनगंगा नदीवर गाजेगाव व वारणटाकळी येथे बंधारा आहे. त्यामुळे बरेच शेतकरी ऊसाचे पीक घेत आहेत.
तालुक्यात २९ हजार ५० विहिरी आहेत. शेतजमीनही नदीकाठची चांगली आहे. बाकी चरडभरड, मध्यम आहे. दरेसरसम साठवण तलाव कोंडला तर शेतकऱ्याची २९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येवून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या साठवण तलावामुळे दरेसरसम, पवना, आंदेगाव, सरसम, खडकी, पार्डी, टेंभी आदी गावाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा शासनाकडून मिळणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे शक्य दिसत नाही.
अस्तित्वात असलेले पवना, सुना, पोटा, दुधड, पिंचोर्डी तलावात मोठा गाळ साचला आहे. हा साचलेला गाळ दरवर्षी काढणे आवश्यक आहे. गाळाचे महत्व अद्यापही शेतकऱ्यांना पटले नाही. शेतकरी रासायनिक खतालाच प्राधान्य देत आहे.
पाचही साठवण तलावात गाळाबरोबर बेशरम, झुडपे, वनस्पती वाढल्याने तलाव उथळ होवून साठवण क्षमता कमी झाली आहे. लोकसहभागातून हा गाळ काढणे आवश्यक आहे.
४ ते ५ कि.मी. पाणीपातळी वाढणार
स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार शासनस्तरावर मावेजा मिळावा व धरण तयार होवून ते कोंडण्यास शेतकऱ्यांनी परवानगी द्यावी यासाठी जि.प. सदस्य सुभाष राठोड, मार्केट कमेटीचे सभापती दत्तराम पा. करंजीकर आणि अधीक्षक अभियंता कुरुडे, कार्यकारी अभियंता तिवारी आणि धरणग्रस्त शेतकरी यांच्यात चर्चा होवून लवकर तोडगा निघावा ही अपेक्षा आहे. साठवण तलाव कोंडल्यास परिसरात ४ ते ५ किमी पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

Web Title: 294 hectares of land will come under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.