शहरं
Join us  
Trending Stories
1
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
2
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
3
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
4
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
5
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
6
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
7
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
8
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
9
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
10
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
11
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
12
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
14
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
15
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
16
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
17
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
18
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
19
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
20
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९०५ कुटुंबांना मिळणार प्रत्येकी १५ हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:40 IST

पावसाळ्यात १७ जणांचा मृत्यू, २ जखमी : १९९ जनावरे दगावली

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या महिन्यातील १२ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे २९०५ कुटुंबांचे संसार वाहून गेले. त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची तातडीची मदत मिळणे शक्य आहे. ४ कोटी ३५ लाखांचा हा निधी असेल. याबाबत प्रशासकीय पातळीवर माहिती संकलन सुरू आहे. 

शासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या पॅकेजच्या निकषामध्ये पुराने सर्वस्व वाहून नेलेल्या कुटुंबांना आधार मिळणार आहे. जिल्ह्यात १ जून ते आजपर्यंत पावसाळ्यात १७ जणांचा मृत्यू झाला; तर २ जखमी झाले. १९९ जनावरे दगावली. ३ मालमत्तांची पूर्णत: पडझड झाली. २५३ मालमत्ता अंशत: पडल्या. १ झोपडी नष्ट झाली, तर ७ गोठे बाधित झाले. ५८७ गावांतील २ लाख ६२ हजार ८४० शेतकऱ्यांची जिरायती, बागायती, फळपिकांसह २ लाख ३६ हजार ५२८ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. आजवर १४ टक्के पंचनामे झाले आहेत.

साडेचारशे कोटी शेतनुकसानीसाठीजिल्ह्यात सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये शेतपिकांच्या नुकसानीसाठी मिळणे शक्य आहे. यात २ लाख २२ हजार ३३० हेक्टर जिरायतीच्या नुकसानीपोटी ४११ कोटी; ९ हजार ३१४ हेक्टर बागायती नुकसानीसाठी ३० कोटी; तर १५ कोटी हे ४ हजार ८८२ हेक्टर वरील फळबागांच्या नुकसानीसाठी मिळतील, असा प्रशासकीय अंदाज आहे.

किती मदत मिळणे शक्य१७ मृत व्यक्ती : वारसांना मिळतील ६८ लाख रुपये२ व्यक्ती जखमी : ७४ हजार ते अडीच लाख रुपये२९०५ कुटुंबांना संसार साधने, कपडे : ४ कोटी ३५ लाख रुपये३ घरांची पडझड : प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये३८९ घरांची अंशत: पडझड : २५ लाख २८ हजार रुपये७ जनावरांचे गोठे : प्रत्येकी ३ हजारांप्रमाणे २१ हजार रुपये१५९ दुधाळ जनावरे : प्रत्येकी ३२५०० प्रमाणे ५९ लाख ६२ हजार रुपये४० ओढकाम करणारी जनावरे : प्रत्येकी ३२ हजारांप्रमाणे १२ लाख ८० हजार रुपये.

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad Flood Victims to Receive ₹15,000 Each; ₹4.35 Crore Allocated

Web Summary : Following heavy rains in Aurangabad, 2905 families will receive ₹15,000 each, totaling ₹4.35 crore, to help recover from losses. Crop damage compensation is estimated at ₹450-500 crore. Seventeen deaths were reported, with compensation for injuries and livestock losses also allocated.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र