शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मराठवाड्यात गुरुवारी कोरोनाचे २६१ नवे रुग्ण; २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 2:24 PM

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ८९ रुग्ण आढळले.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला.लातूर  जिल्ह्यात ४१ नव्या बाधित रुग्णांची भर पडली.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवारी कोरोनाचे नवे २६१ रुग्ण आढळले आहेत. तसेच दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ८९ रुग्ण आढळले. दिवसभरात ८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एकही मृत्यूची नोंद नाही.

जालना जिल्ह्यातही नव्याने १८ रुग्णांची भर पडली आहे. नांदेड  जिल्ह्यात कोरोनाचे ३२ नवे रुग्ण आढळले आहेत, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३८ रुग्ण उपचारानंतर घरीही परतले आहेत. एकूण रुग्णसंख्या २० हजार ९४३ वर पोहोचली आहे तर ५६२ कोरोना बळी ठरले आहेत. जिल्ह्यात आजघडीला २७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच ४५ नवे रुग्ण आढळले तर ३० जणांनी कोरोनावर मात केली. आता एकूण बाधितांची संख्या १६ हजार ३११ एवढी झाली आहे. पैकी १५ हजार ४३७ कोरोनामुक्त झाले असून ५२० जणांचा मृत्यू झाला आहे.

लातूर  जिल्ह्यात ४१ नव्या बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे बाधितांचा आलेख २२ हजार ५१७ वर पोहोचला असून, आतापर्यंत २१ हजार ४६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये ३८२ जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाने आतापर्यंत ६६७ जणांचा बळी घेतला आहे.

हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  ४ रुग्ण बरे झाले.  आजपर्यंत कोविडचे एकूण ३ हजार ४४७ रुग्ण झाले असून, त्यापैकी ३ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला जिल्ह्यात एकूण ३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५२ व्यक्तींचा मृत्यू झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. १० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार १०० इतकी नोंद झाली. यातील ५५८ रुग्णांचा मृत्यू झाला. १५ हजार ४१९ रुग्ण उपचाराअंती ठणठणीत झाले. सध्या १२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

परभणी जिल्ह्यात २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, १२ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ४२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ७ हजार ९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद