जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचे २६ प्लांट
By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:50+5:302020-12-05T04:07:50+5:30
-साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : स्मार्ट औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली. शहरात मानांकन व अन्न ...

जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचे २६ प्लांट
-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : स्मार्ट औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली. शहरात मानांकन व अन्न व औषधी प्रशासनाकडे नोंद असलेले २६ प्लांट जिल्ह्यात आहेत. परंतु आरो फिल्टर केलेले पाणी विकणाऱ्या जार विक्रेत्यांची संख्या १ हजार पेक्षा अधिक असून, त्यावर कोणाचेही बंधन नाही.
हे पाणी पिण्यास किती योग्य आणि जनतेने हे पाणी कधीही तपासले नाही किंवा त्याच्यावर मानांकन असलेला शिक्का नाही, प्लास्टिकचे जार विक्रमी विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णालय, हॉटेल, विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात जारचे पाणी पिण्याची फॅशन झाली आहे. रिकामे करून आणले जाणार त्याची सफाई गरम पाण्यात केली जाते काय, कोणत्या घरातून कोणता आला याचा काहीच थांगपत्ता नसतो. यातून कोरोना वाढतोय की घटतोय यावर कुणी लक्ष देत नाही. गल्लीबोळात फिल्टर पाणी विकण्याची दुकाने मांडली आहेत.
बाटलीबंद पाणी विकणाऱ्या मानांकन असलेल्या कंपन्यांची अन्न औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी होते, प्रत्येकवेळी सूचना दिल्या जातात. अन्यथा दंडात्मक कारवाई देखील केली जाते.
महानगरपालिका अथवा बोअरवेलचा पाणीपुरवठा केला जातो. पाण्यातील क्षार किती , फिल्टर केलेले पाणी जारच्या माध्यमातून अथवा लोकल भागात बाटलीबंद करून प्रवासी, यात्रा, उत्सवात विकले जाते. दोन पैशाने कमी मिळत असलेली पाण्याची बॉटल विकत घेऊन तहान भागविली जाते.
जिल्ह्यात नोंदणीकृत २६ प्लांट ....
कायद्याने नोंदणीकृत असलेले २६ प्लांट असून, बाटलीबंद पाण्याच्या कारखान्याचे नियंत्रण एफडीएकडे आहे. इतर गल्लीबोळात सुरू असलेल्या आरो प्लांटवर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांचे नियंत्रण एफडीएकडे येत नाही.
- मिलिंद शहा,सह आयुक्त (अन्न व औषधी प्रशासन विभाग)