आढावा बैठकीस २५ वरिष्ठांनी पाठविले कनिष्ट अधिकारी; जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना हाकलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:31 IST2025-05-21T15:30:02+5:302025-05-21T15:31:27+5:30

डीपीसीच्या पूर्व नियोजन आढावा बैठकीकडे वरिष्ठांची पाठ

25 seniors sent junior officers to a review meeting; District Collector Dilip Swami sent everyone away! | आढावा बैठकीस २५ वरिष्ठांनी पाठविले कनिष्ट अधिकारी; जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना हाकलले!

आढावा बैठकीस २५ वरिष्ठांनी पाठविले कनिष्ट अधिकारी; जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना हाकलले!

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) पूर्वनियोजन बैठकीला विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीस सर्व विभागांचे कनिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध विभागांना गांभीर्य नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरीत बाहेरचा रस्ता दाखवला.

जिल्हा नियोजन समितीसाठी २०२५-२६ मध्ये सुमारे सातशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतील कामांचे पूर्वनियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महापालिका, जि.प., पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक कार्यालय, सा. बां. विभाग, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, महावितरण, महाऊर्जा, राज्य पुरातत्त्व विभाग, केंद्र पुरातत्त्व विभाग, पाटबंधारे विभाग यांसह सर्व संबंधित विभागांच्या सुमारे ६० वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक माहितीसह बोलावण्यात आले होते.

बैठकीला विविध विभागांचे ३० वरिष्ठ अधिकारीच उपस्थित होते. उर्वरित २५ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीस पाठवून दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आराखड्यांविषयी विभागनिहाय माहिती विचारली असता या कनिष्ठ अधिकाऱ्यांना काहीही सांगता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी संतप्त झाले. त्यांनी संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेऊन बाहेरचा रस्ता दाखवला.

Web Title: 25 seniors sent junior officers to a review meeting; District Collector Dilip Swami sent everyone away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.