थरारक! भररस्त्यात दुचाकीवरील दोघांना पाडत २५ लाखांची रोकड पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 16:34 IST2023-03-27T16:34:09+5:302023-03-27T16:34:30+5:30
सिलोड - भराडी रस्त्यावरील थरारक घटना

थरारक! भररस्त्यात दुचाकीवरील दोघांना पाडत २५ लाखांची रोकड पळवली
सिल्लोड : दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी लाथ मारुन खाली पाडत पंचवीस लाख रुपय लुटल्याची घटना आज दुपारी साडे बाराच्या सुमारास शहरालगत असलेल्या सिल्लोड- भराड़ी रस्त्यावरील आनंद पार्क जवळ घडली. भरदिवसा झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
शहरातील स्टेट बँक ऑफ़ इंडियामधून पंचवीस लाख रुपये घेऊन नवनीत जिनिंगकडे दोघे दुचाकीवरुन जात होते. या दरम्यान पाठीमागुन दोघेजण दुचाकीवरुन आले. त्यांनी समोरील दुचाकीला लाथ मारल्याने पैशांच्या बॅगसह दोघे खाली पडले. ही संधी साधत मागील दुचाकीवरील दोघे पैशांची बॅग घेऊन पसार झाले.
माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली व रस्त्यांवर नाकाबंदी केली. भरदिवसा ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.