२४ तास रेकॉर्डिंगसह सुरक्षा रक्षक हवेत
By Admin | Updated: November 26, 2014 01:09 IST2014-11-26T00:37:29+5:302014-11-26T01:09:30+5:30
लातूर : सराफा दुकानात २४ तास कार्यरत राहणाऱ्या रेकॉर्डिंगची सुविधा असलेली यंत्रणा बसविण्यात यावी़ क्लोज सर्कीट कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेरे,

२४ तास रेकॉर्डिंगसह सुरक्षा रक्षक हवेत
लातूर : सराफा दुकानात २४ तास कार्यरत राहणाऱ्या रेकॉर्डिंगची सुविधा असलेली यंत्रणा बसविण्यात यावी़ क्लोज सर्कीट कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेरे, रेकॉर्डिंग अलार्म सिस्टीम बसवून घ्याव्यात़ तसेच तीन-चार दुकानदारांनी मिळून खाजगी सुरक्षा रक्षक नेमावेत, अशा सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सराफा असोशिएशनच्या बैठकीत मंगळवारी केल्या़
अवैध प्रवासी वाहतूक व सराफा असोशिएशन समन्वय समितीची बैठक जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ यावेळी त्यांनी सतर्कतेबाबत सराफा दुकानदारांना सूचना केल्या़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी़जी़ मिसाळ, सराफा असोशिएशनचे पदाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक तसेच मनपा आयुक्तांची उपस्थिती होती़ यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक चव्हाण म्हणाले, ज्वेलर्समध्ये दुकानदारांनी २४ तास रेकॉर्डिंगची सुविधा कार्यान्वीत करावी़ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच क्लोज सर्कीट कॅमेरे बसवावे, दुकानातील सहज प्रवेश टाळण्यासाठी भक्कम बांधकाम, उच्च प्रतीचे शटर्स, मजबूत लॉकर्सची व्यवस्था करावी़ दुकानातील शोकेसमध्ये शक्यतो नकली दागीने ठेवावेत़ परिसरातील पेट्रोलिंगसाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात रहावे़ संशयीत व्यक्ती दुकानात आल्यास त्याच्यावर नजर ठेऊन त्वरीत पोलिस स्टेशनला कळवावे़ दुकानात असलेल्या कामगारांचे फोटो, नाव, पत्ता घेऊनच रेकॉर्ड ठेवावे़ बंदुकीची आवश्यकता असल्यास घटक प्रमुखाने अर्ज करावे़ तारण ठेवण्यासाठी आलेल्या व्यक्तीची खातरजमा करुन चोरीचा माल असल्याचा संशय येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, अशी सुचनाही जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केली़ दोन-तीन महिला ग्राहक म्हणून येऊन वेगवेगळ्या दागीन्यांची मागणी करतात़ लक्ष विचलीत करुन चोरी केल्याचे गुन्हे घडले आहेत़ त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)४
सोन्या-चांदीच्या दुकानांत तीन-चार महिला एकत्र येऊन दुकानदारांचे लक्ष दुसरीकडे विचलित करून चोऱ्या केल्याची उदाहरणे घडली आहेत. अशाही बाबींवर लातुरातील ज्वेलर्स व्यापाऱ्यांनी लक्ष ठेवावे. जेणेकरून दिवसाढवळ्या फसवणूक होणार नाही. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यासाठी सतर्क रहावे, असेही पोलिस अधीक्षक म्हणाले.