शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक अडचणीत धावून येणार ‘२४ तास हेल्पलाईन’

By admin | Updated: October 2, 2014 01:22 IST

औरंगाबाद : आता कुठल्याही अडचणीमुळे हताश होण्याची गरज नाही. कारण तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी धावून येणारी ‘२४ तास हेल्पलाईन’ औरंगाबादेत पुढे येतेय.

औरंगाबाद : आता कुठल्याही अडचणीमुळे हताश होण्याची गरज नाही. कारण तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी धावून येणारी ‘२४ तास हेल्पलाईन’ औरंगाबादेत पुढे येतेय. जी तुमच्या अगदी लहान-सहान पण त्रासदायक अशा अडचणी सोडविण्यासाठी तुम्हाला सहकार्य करणार आहे. आमदार राजेंद्र दर्डा यांनी बनविलेल्या औरंगाबादच्या जाहीरनाम्यात यासह अनेक महत्त्वाच्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनलेला औरंगाबादचा जाहीरनामा तयार झाला आहे. तब्बल ५२ हजार घरांपर्यंत जाऊन, जनतेची मते विचारात घेऊन हा जाहीरनामा अर्थात ‘व्हिजन औरंगाबाद’ तयार करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची मते जाणून घेऊन एखाद्या उमेदवाराने आपला जाहीरनामा तयार करणे हा निवडणुकीच्या इतिहासातील विक्रमच आहे. त्यामुळे औरंगाबादच्या विकासाच्या दृष्टीने तयार केलेल्या या जाहीरनाम्याचे महत्त्व वाढले आहे. आमदार राजेंद्र दर्डा यांच्या संकल्पनेतून ‘टीम औरंगाबाद’ने औरंगाबादचा जाहीरनामा तयार करण्याचा संकल्प केला आणि जोमाने कामाला सुरुवात केली. यासाठी प्रारंभी औरंगाबादच्या प्रमुख विषयांच्या जाणिवेतून प्रश्नावली तयार करण्यात आली. औरंगाबादकरांना भविष्यातील शहर कसे हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले. यामध्ये अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याने जाहीरनामा तयार करण्याच्या कामाला गती मिळाली. औरंगाबादकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. औरंगाबादचा जाहीरनामा अर्थात ‘व्हिजन औरंगाबाद’ पाहून आपण औरंगाबादच्या विकासात जनतेची भूमिका जाणून घेऊ शकतो याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया राजेंद्र दर्डा यांनी दिली. ‘व्हिजन औरंगाबाद’ हे केवळ देखाव्याकरिता तयार करण्यात आालेला निवडणूक जाहीरनामा नसून औरंगाबादला एक अत्याधुनिक महानगर बनविण्यासाठी जनतेनेच तयार केलेले व्हिजन असल्याचे राजेंद्र दर्डा म्हणाले.५२ हजार घरांचा महासर्व्हे करून बनविले ‘व्हिजन औरंगाबाद’ शहरात पासपोर्ट कार्यालय; सर्वत्र वायफाय; लघु, मध्यम उद्योगांना प्रोत्साहनराजेंद्र दर्डा यांच्या जाहीरनाम्यात जनतेच्या आशा-आकांक्षापूर्तीचे आश्वासन पायाभूत सुविधांना प्राधान्य‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येईल. नवीन औरंगाबादेत सिडको व म्हाडाच्या माध्यमातून घरांची उभारणी करण्यात येईल. प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरात प्रत्येक वॉर्डात किमान एक सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. ‘झंडा ऊंचा रहे हमारा...’राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम करीत औरंगाबादचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुवर्णाक्षरांत नोंदविण्यात आले. आता शहरात सर्वांत उंच राष्ट्रध्वज फडकविण्यात येईल. देशप्रेमाचा नवा आदर्श घालून देण्यासाठी एक अभियान म्हणून हा संकल्प पूर्णत्वास नेण्यात येईल.