२२७ रस्ते घेणार मोकळा श्वास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:35 IST2018-12-12T00:34:30+5:302018-12-12T00:35:00+5:30
पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून २२७ रस्त्यांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी सादर करण्यात आला असून, सोयगाव तालुक्यात २२७ रस्ते आता या योजनेतून मोकळा श्वास घेणार आहेत.

२२७ रस्ते घेणार मोकळा श्वास!
लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून २२७ रस्त्यांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी सादर करण्यात आला असून, सोयगाव तालुक्यात २२७ रस्ते आता या योजनेतून मोकळा श्वास घेणार आहेत. या रस्त्यांच्या कामांमुळे ऐन दुष्काळात मजुरांच्या हातांना काम मिळणार असल्याने त्यासोबतच शेतकऱ्यांनाही आता शेतीच्या बांधापर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे.
तालुक्यात २२७ रस्त्यांचा कृती आराखडा सादर करताच या सर्वच रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने मंजुरीही देण्यात आल्याने या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दहा लाख रुपये निधीही प्राप्त झाला असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.
सकाळी कृती आराखडा सादर करताच दुपारी दोन वाजता मंजुरी मिळताच सोयगाव तालुक्यातील दुष्काळाची दाहकता पसरलेल्या डाभा गावातून या कामांना प्रारंभ करण्यात आला.