२१ हजार सातबारांचे फेरफार आॅनलाईन
By Admin | Updated: January 12, 2016 00:06 IST2016-01-12T00:00:22+5:302016-01-12T00:06:17+5:30
औरंगाबाद : तालुक्यातील २१२ गावांतील २१ हजार जमिनीच्या व्यवहारांचे फेरफार रखडले असून ते महिनाभरात आॅनलाईन करण्यासाठी

२१ हजार सातबारांचे फेरफार आॅनलाईन
औरंगाबाद : तालुक्यातील २१२ गावांतील २१ हजार जमिनीच्या व्यवहारांचे फेरफार रखडले असून ते महिनाभरात आॅनलाईन करण्यासाठी डाटा एण्ट्रीचे काम सुरू करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. तहसीलदार रमेश मुंडलोड यांची यावेळी उपस्थिती होती.
हदगल यांनी सांगितले, २०१४ पासून २१ हजार सातबाऱ्यावरील फेरफार नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत. ५८ हजार खातेधारकांचा सर्व डाटा आॅनलाईन आहे; परंतु तो अपडेट झालेला नाही. त्यामुळे आॅनलाईन सातबारा मिळण्यात अडचणी असून जुन्या नोंदीनुसारच सातबारा मिळतो आहे. १० संगणक व आॅपरेटर यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी व्यवहार अपडेट करण्यासाठी सरसावतील. विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी आदेश दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. ई-चावडीचा हा उपक्रम असून त्याला आता चालना मिळणार आहे. जुन्या प्रलंबित फेरफारांचा रेकॉर्ड आहे. कालपर्यंत खाजगी संस्थेक डे ते काम देण्यात आले होते. ज्या जमिनींच्या व्यवहारांचे वाद आहेत, त्यांची सुनावणी होईल. त्यानंतर डाटा अपडेट केला जाईल. सध्या जी कागदपत्रे आहेत, ती संगणकावर टाकली जातील.