शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

२००६ पैठण पूर: २० व्यापारी अडकले; मदतीसाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:41 IST

‘आम्ही दुकानांवर अडकलो, वाचणे कठीण, हा शेवटचा कॉल समजा’; सहा तास पाण्याने वेढलेले, व्यापाऱ्यांनी सांगितली २००६ मधील आपबिती

- राहुल जगदाळे 

छत्रपती संभाजीनगर : आम्ही बसस्थानक व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर आम्ही २० जण अडकलो होतो. त्याचवेळी धरणातून आणखी विसर्ग वाढवून तीन लाखांवर करण्यात येणार असल्याचे कळाले. आता आमचे काही खरे नाही, वाचणे कठीण आहे, हा आमचा शेवटचा कॉल समजा, असे मित्रांना कळवूनही टाकले होते, अशी २००६ मधील आपबिती आणि सहा तासांचा थरार पैठणच्या व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना कथन केली.

पैठण शहर व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया यांनी २००६ मधील परिस्थितीला उजाळा दिला. ते म्हणाले, जायकवाडीतून अडीच लाख विसर्ग करणार असल्याचे प्रशासनाने सकाळी अचानक सांगितले. कोणालाच किती पाणी येईल, याचा अंदाज नव्हता. आमच्या वडिलांनी १९९१ मध्ये महापुरातही शहरात जास्त पाणी शिरले नव्हते. त्यामुळे दुकाने पाण्याखाली जातील, याची अपेक्षाच नव्हती. केवळ तीन फूट पाणी येईल, असे वाटले होते. परंतु, आमची दुकानेच पाण्याखाली गेली होती. त्यामुळे बसस्थानक व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावरील नातेवाईक, मित्रांच्या दुकानांत शक्य तेवढे साहित्य, माल हलवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. आम्ही संकुलावर अडकलो. दुपारनंतर जायकवाडीतून ३ लाख विसर्ग करणार असल्याचे कळाले. त्यामुळे स्वाभाविक भीती वाटली. त्याचवेळी आमच्यापैकी काहींकडे असलेल्या मोबाइलवरून नातेवाईक, मित्रांना कॉल करू लागलो. आता आम्ही काही परतत नाही. हा आमचा शेवटचा कॉल समजा, असे सांगूनही टाकले होते, असे लोहिया म्हणाले.

मदतीसाठी थेट विलासरावांना फोनबसस्थानक व्यापारी संकुलावर २० व्यापारी अडकले आहेत, त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यासाठी थेट तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी फोन केला. देशमुख यांनी व्यवस्था करतो, असे सांगितले. परंतु, सुदैवाने विसर्ग वाढविला गेला नव्हता शिवाय, कहार समाजाच्या होड्यांच्या मदतीने प्रशासनाने आम्हाला सोडवले. हा सहा तासांचा थरार आजही अंगावर शहारा आणतो, असे लोहिया म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : 2006 Paithan Flood: 20 Traders Stranded, CM Deshmukh Called for Help

Web Summary : In 2006, 20 Paithan traders were trapped by a sudden flood. Believing death was near, they called relatives. Ex-Minister Patel contacted CM Deshmukh for helicopter rescue. Fortunately, discharge stabilized, and local boats rescued them after a harrowing six hours.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfloodपूरRainपाऊसriverनदी