शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

२००० ‘प्लेटलेटस’च्या रूग्णास जीवदान

By admin | Updated: November 8, 2014 23:37 IST

हिंगोली : नाममात्र २००० प्लेटलेट राहिलेल्या रूग्णास एकही रक्ताची बॅग व प्लेटलेट न देता त्याला जीवदान देण्यात हिंगोलीच्या डॉक्टरांना यश आले आहे.

हिंगोली : नाममात्र २००० प्लेटलेट राहिलेल्या रूग्णास एकही रक्ताची बॅग व प्लेटलेट न देता त्याला जीवदान देण्यात हिंगोलीच्या डॉक्टरांना यश आले आहे. विशेषत: नांदेडातील नामांकित रूग्णालयात उपचारासोबतच औरंगाबादेत ‘बोन मॅरो’ची तपासणी करूनही हताश झालेल्या या रूग्णास हिंगोलीत जीवदान मिळाल्याने डॉक्टरांचे कौतुक होत आहे. शिवाय दर्जेदार सुविधा आणि खात्रिशीर उपचारासाठी जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाऊन खिसा रिकामा करणाऱ्या रूग्णांचा समज या उपचाराने खोटा ठरवला आहे. जिल्ह्यात मागील अडीच महिन्यापांसून तापाची साथ आटोक्यात आलेली नाही. त्यात हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील संभाजीअप्पा घोडेकर (वय ४८) यांना तापाने घेरले. ती आटोक्यात न आल्याने त्यांनी नांदेड गाठले. मोठ्या आशेने नामांकित रूग्णालयात उपचार घेऊ लागले; परंतु प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाऊ लागली. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने येथील डॉक्टरांनी प्लेटलेटस्च्या दोन बॅग चढवल्या. तरीही घोडेकर यांच्या स्वास्थ्यावर तीळमात्र फरक पडला नाही. म्हणून योग्य निदानासाठी औरंगाबाद गाठून बोन मॅरोची तपासणी केली. एकीकडे पाण्यासारखा पैसा जात असताना दुसरीकडे आरोग्य जाग्यावर आले नाही. उपचारासाठी नांदेडसारख्या ठिकाणी पंधरवडा घातल्यानंतर खालावलेल्या प्रकृतीसह गावी परतले. शेवटी एकाच्या सल्ल्यावरून हिंगोलीतील रूग्णालयात गेले. विविध ठिकाणी उपचार घेऊन अर्धा महिना घातल्यानंतर घोडेकर यांनी उपचारासाठी तयारी दर्शविली पण खात्रीच्या इलाजाबाबत विश्वास नव्हता. पाहताक्षणी डॉ. अशोक गिरी यांनी रूग्णाच्या प्लेटलेटस्ची तपासणी केली. २००० पर्यंत प्लेटलेटस्खाली आल्याचे पाहून उपचाराबाबत डॉक्टरही संभ्रमात पडले. तत्काळ तापीचे प्रतिजैवके व हिवताप प्रतिबंधक औषधी सुरू केली. योग्य आहार आणि उपचारांत बदल केला. दरम्यान, वेळोवेळी लक्ष देऊन उपचार धीर दिल्याने घोडेकर यांना हळूहळू बरे वाटायला लागले. २ हजारांवरून प्लेटलेटस् वाढत जाऊन १ लाखांचा आकडा ओलांडल्याचे डॉ. सोफिया खान यांनी सांगितले. शेवटच्या तपासणीत तब्बल १ लाख १९ हजारावर प्लेटलेट गेल्याने घोडेकर शुक्रवारी ठणठणीत झाले.(प्रतिनिधी)