शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जीममध्ये व्यायामानंतर अचानक चक्कर येऊन कोसळली; २० वर्षीय तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:22 IST

प्रियंका बी. फार्मसी पदवीधर असून गेल्या महिन्याभरापासून भाऊ व मैत्रिणीसह नियमित व्यायाम करण्यासाठी जीममध्ये जात होती.

छत्रपती संभाजीनगर : गुरुवारी सायंकाळी व्यायाम झाल्यानंतर जीममध्ये अचानक चक्कर येऊन पडलेल्या २० वर्षीय प्रियंका अनिल खरात या तरुणीचा हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शहरातील बीड बायपास परिसरात घडली. प्रियंका बी. फार्मसी पदवीधर असून गेल्या महिन्याभरापासून भाऊ व मैत्रिणीसह नियमित व्यायाम करण्यासाठी जीममध्ये जात होती.

गुरुवारी सायंकाळी प्रियंका वडिलांना चहा करून देऊन ‘मी जीमला जाऊन येते’ असे सांगून निघाली होती. भाऊ यश व मैत्रीण प्रणाली कुलकर्णी हे सुद्धा सोबत होते. प्रणालीने सांगितले की, जीममध्ये जाताना तिने काही दुखते असे सांगितले नाही, हसत खेळत तिने व्यायाम केला. व्यायाम संपल्यानंतर भावाची वाट पाहत असतानाच तिला अचानक चक्कर आली व ती खाली कोसळली.

तिला तातडीने जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. बीड बायपास येथील म्हस्के पेट्रोलपंपाशेजारील अपार्टमेंटमध्ये प्रियंका कुटुंबासह राहत होती. तिचे वडील अनिल खरात हे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. प्रियंका ही कुटुंबातली मोठी मुलगी होती. तिच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी तिच्या पार्थिवावर गादीया विहार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान वयात हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.

प्रियंकाने दिलेला संध्याकाळचा चहा शेवटचा ठरला...अनिल खरात यांनी सांगितले की, प्रियंकाची आई कामानिमित्त बाहेर गेली असताना सायंकाळी प्रियंकाने मला चहा करून दिला. बाबा मी जीमला जाऊन लवकर येते, असे म्हणून ती गेली व तिच्या हाताने बनविलेला चहा शेवटचा ठरला.

भाऊ-बहिणीचे नाते घट्टप्रियंका व तिचा भाऊ यश या दोघांत मैत्रीचे नाते होते, ते सतत सोबत वावरत असत. अगदी, भाजी आणायची असो वा फेरफटका मारायचा, दोघेही कधी एकटे जात नसत. जीमलाही त्यांनी एकत्र सुरुवात केली होती. त्यामुळे बहिणीच्या आकस्मिक निधनाने यशला मोठा धक्का बसला. आता प्रियंका कधीच सोबत राहणार नाही, असे म्हणत त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

व्यायामापूर्वी वाॅर्मअप महत्त्वाचेव्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे खूप आवश्यक आहे. वॉर्मअपशिवाय कोणताही व्यायाम करता कामा नये. व्यायाम करताना डिहायड्रेशन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अधूनमधून पाणी पीत राहावे. डिहायड्रेशन झाले तर रक्तदाब कमी होऊन चक्कर येऊन प्रसंगी जिवाला धोका उद्भवतो. आजारी असताना व्यायाम करणे टाळावे.- डॉ. गणेश सपकाळ, हृदयरोगतज्ज्ञ.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू