शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० टक्केच पीक कर्ज वाटप!

By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST

जलना : संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे.

जलना : संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे. शुक्रवारपर्यंत केवळ २० टक्केच कर्ज वाटप झाले असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांसमोर बी, बियाणे खते खरेदी आणि पेरणीसाठी पैसा नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वारंवार बँकेत खेटे मारूनही कर्ज वितरित होत नसल्याने हतबल शेतकऱ्यांनी सावकारांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे.
या जिल्ह्यास गेल्या खरीप हंगामात ६२४. ५१ लाख एवढे पीक कर्जाचे उद्दिष्ट होते; परंतु महसूल प्रशासनाने बँकांच्या मागे मोठा तगादा लावल्यानेच ७१३ कोटी रुपयांचे पीकइकर्ज वितरित झाले. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वितरीत झाले. गतवर्षी समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक होती. फेब्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. गेल्या दोन वर्षांपूर्वीचा दुष्काळ पाठोपाठ गारपिटीच्या संकटाने ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली. या संकटातून सावरत शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे.
गेल्या महिनाभरापासून खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जमीन सज्ज केली असून, मोठा पाऊस पडल्यास पेरणी सुरु होणार असे चित्र आहे. परंतु, बँकांकडून आजपर्यंत एक नया पैसाही शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही, असे चित्र आहे. शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु बँका कासवगतीने कर्ज वाटप करत आहेत. मात्र, यासाठी शेतकऱ्यांची पदोपदी अडवणूक करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना बँकेत दररोज चकरा माराव्या लागत आहेत. आज या, उद्या या, तुमच्या कागदपत्रांत काही त्रुटी आहेत, अशा अनेक गोष्टी ऐकाव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
यावर्षी खरीप हंगामाचे ७९७ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे; परंतु ७ जूनपर्यंत १५३ कोटी ७३ लाख एवढे म्हणजे सरासरी २० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २२ कोटी ९९ लाख पीक कर्ज वाटप केले, ग्रामीण बँकेने ४४ कोटी २१ लाख, सहकारी बँकने ८६ कोटी ५१ लाख, खाजगी बँकेने ६ कोटी २ लाख पीक कर्ज वाटप केले आहे.
जिल्हा आग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश बोरूडे म्हणाले, लवकरच दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. खरीप आणि रब्बीचा असा १ वर्षाचा ९६६ कोटी २५ लाख पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. येत्या १ आक्टोबरपासून रब्बीचे देखील पीक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शेतकरी सावकारांच्या दारात...
खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज प्रक्रियेची कागदपत्रे तयार केली. मात्र बँकांच्या अडचणुकीच्या धोरणामुळे, उडवाउडवीच्या उत्तरांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कर्ज न मिळाल्यास नाईलाजास्तव सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात.