१९ उमेदवारांनी घेतले ४४ हजार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:05 IST2019-05-25T00:05:13+5:302019-05-25T00:05:34+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विधानसभानिहाय आणि उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. विजयासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतविभाजनासाठी जी व्यूहरचना आखली होती, ती यशस्वी न झाल्याचे चित्र मतदानाच्या आकड्यांतून दिसते आहे.

१९ उमेदवारांनी घेतले ४४ हजार मतदान
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विधानसभानिहाय आणि उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. विजयासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतविभाजनासाठी जी व्यूहरचना आखली होती, ती यशस्वी न झाल्याचे चित्र मतदानाच्या आकड्यांतून दिसते आहे.
खा.इम्तियाज जलील, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी आ. हर्षवर्धन जाधव, आ.सुभाष झांबड यांच्यासह इतर पक्ष व अपक्ष मिळून १९ उमेदवार लोकसभा निवडणुकीत होते. यातील काही अपक्ष उमेदवार पक्ष उमेदवाराच्या सांगण्यावरून मैदानात होते तर काही स्वयंफूर्तीने होते. दोन उमेदवार खुल्या प्रवर्गाचे होते, तर सहा मुस्लिम आणि ८ मागासवर्गीय होते. ३ उमेदवार इतर प्रवर्गाचे होते. या सर्व १९ उमेदवारांनी ४४ हजार ८० इतके मतदान घेतले. मुस्लिम आणि दलित उमेदवारांनी चारअंकी मतदान घेतले तरी खा.इम्तियाज जलील यांचे मताधिक्य कमी झाले नाही. विशेष म्हणजे यातील काही उमेदवारांना ५३ टपाली मते मिळाली आहेत. लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रात १९ उमेदवारांना थोड्या-अधिक प्रमाणात मते मिळाली आहेत. या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे विजय आणि पराभवाची समीकरणे बदलली.
-------------