१७ लाखांचा निधी धूळखात !
By Admin | Updated: July 27, 2014 01:14 IST2014-07-27T00:34:03+5:302014-07-27T01:14:40+5:30
काक्रंबा : ऐकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची आणि निधी मिळाला तर खर्च करायचा नाही, असाच काहीसा कारभार काक्रंबा ग्रामपंचायतीचा सुरू आहे.

१७ लाखांचा निधी धूळखात !
काक्रंबा : ऐकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची आणि निधी मिळाला तर खर्च करायचा नाही, असाच काहीसा कारभार काक्रंबा ग्रामपंचायतीचा सुरू आहे. विविध विकास कामांसाठी तब्बल १७ लाखांचा निधी मिळूनही मागील सात ते आठ महिन्यांपासून खर्च केला गेला नाही. ग्रामपंचायतीच्या या उदासीन धोरणामुळे त्याचा थेट गावाच्या विकासावर परिणाम होत आहे.
तालुक्यातील काक्रंबा येथील स्मशानभूमीत अनेक पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने ग्रामस्थांना बाराही महिने अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याने काक्रंबा स्मशानभूमीचे रुपडे बदलण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडून विशेष तरतूद करुन काक्रंबा येथील स्मशानभूमीसाठी १० लाख रुपये निधी मंजूर करुन १० ते ११ महिने झाले आहेत. या निधीतून काक्रंबा ग्रामपंचायतीपासून स्मशानभूमीपर्यंत सिमेंट रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूने स्मशानभूमीपर्यंत सौरदिवे लावणे, हातपंप घेवून पाण्याची सोय करणे, दफनभूमी करुन वरील स्लॅब टाकून कट्टा बांधणे आदी कामांचा समावेश आहे. उपरोक्त कामांसाठी निधी मंजूर होवून जवळपास ११ महिन्याचा कालावधी झाला असताना देखील सदरील कामाचे ई-टेंडरच झालेले नाही. याकडे ग्रामपंचायतीकडून अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे.
त्याचप्रमाणे येथील दलित वस्तीमध्ये समाज मंदिर सभागृह बांधकामासाठी दलित वस्ती सुधार योजनेमधून ७ लाख रुपये इतका निधी मंजूर झाले आहेत. यालाही ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या देखील कामाचे ई-टेडरींग होवू शकलेले नाही. या दोन्ही विकास कामांसाठी आलेल्या निधीचा विचार केला असता हा आकडा १७ लाखावर जावून ठेपला आहे. हा निधी धूळखात पडून आहे. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवकांच्या उदासीन धोरणामुळे गावच्या विकास कामांना बे्रक लागला आहे. (वार्ताहर)