शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

१७ कोटींच्या तलावाची कंदरभरणी होईना !

By admin | Updated: August 18, 2014 01:00 IST

जळकोट : तालुक्यातील जवळपास १ हजार हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेल्या डोंगरकोनाळीच्या साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे आले असतानाही

जळकोट : तालुक्यातील जवळपास १ हजार हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेल्या डोंगरकोनाळीच्या साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे आले असतानाही केवळ कंदरभरणी अभावी पाणी साठविणे थांबले आहे़ जळकोट तालुक्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डोंगरकोनाळीच्या मोठ्या साठवण तलावाला २००९-१० साली मंजुरी मिळाली आहे़ त्याअनुषंगाने या तलावाचे काम मागील जून महिन्यापर्यंत सुरु होते़ मात्र आता हे काम थांबविण्यात आले आहे़ या तलावाचे बुडीत क्षेत्र ६२ हेक्टर्स इतके असून, ७५५ हेक्टर्स क्षेत्र प्रत्यक्ष ओलिताखाली येणार आहे़ शिवाय, पाण्याच्या मुरण्यामुळे २०० ते २५० हेक्टर्स क्षेत्राला फायदा होणार आहे़ तलावानजिकच्या कोळनूर, सोनवळा, डोंगरकोनाळी या गावांसोबतच जळकोट, पाटोदा, लाळीलाही या तलावाचा फायदा आहे़ सध्या जळकोट तालुक्यात २५ हजार हेक्टर्स क्षेत्र लागवडीयोग्य आहे़ त्यापैकी २ हजार हेक्टर्स क्षेत्र ऊसाखाली आहे़ डोंगरकोनाळीच्या एकट्या साठवण तलावामुळे ऊसाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी सेईल़ इतकेच नव्हे तर परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे़ मात्र, केवळ कंदरभरणीचे काम थांबले असल्यामुळे आजघडीला तलावात पाण्याची साठवणूक करणे शक्य राहिले नाही़ त्यामुळे लवकरात लवकर हे काम करावे, अशी मागणी माजी सरपंच व्यंकटराव कवठाळे, चेअरमन संगमेश्वर टाले, चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे़