१७ अंगणवाडी केंद्रांना ‘आयएसओ’ मानांकन
By Admin | Updated: August 17, 2014 00:15 IST2014-08-17T00:15:22+5:302014-08-17T00:15:22+5:30
जालना : जिल्ह्यातील १७ अंगणवाडी केंद्रांना ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. एकात्मिक बाल सेवा योजना प्रकल्प २ अंतर्गत १७ अंगणवाडी

१७ अंगणवाडी केंद्रांना ‘आयएसओ’ मानांकन
जालना : जिल्ह्यातील १७ अंगणवाडी केंद्रांना ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
एकात्मिक बाल सेवा योजना प्रकल्प २ अंतर्गत १७ अंगणवाडी केंद्रांचे आयएसओ मानांकनासाठी १ व २ आॅगस्ट रोजी लेखापरिक्षण करण्यात आले. औरंगाबाद येथील परिजात कन्सल्टन्स या एजन्सीने सूचनेप्रमाणे या अंगणवाड्यांचे या दोन दिवसात अंतिम लेखापरिक्षण पूर्ण केले. त्यात मौजपुरी भिलपुरी, मानेगाव खालसा, साळेगाव नेर, पाथ्रुड, सावंगी तलाव, बरडी, मोतीगव्हाण, मोतीगव्हाण, जळगाव, वखारी, वडगाव, उटवद, नसडगाव, कोठा, सोलगव्हाण (सर्व ता.जालना), दहिफळ (ता.मंठा) येथील अंगणवाडीचा समावेश होता. आयएसओ मानांकनासाठी प्रकल्पातील या अंगणवाडी केंद्रांची नोंदणी करण्यात आली होती. सर्व अंगणवाडी केंद्रांनी ग्रामपंचायतीमार्फत प्राप्त निधी व लोकसहभागाद्वारे आयएसओ मानांकनासाठी निकष पूर्ण केल्याचे आढळून आले. या कामात संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व महिला यांचा अमूल्य सहभाग जाणवून आला. सर्व निकषांची पूर्तता केल्यामुळे या केंद्रांना आयएसओ मानांकन प्राप्त केंद्रे म्हणून गुरुवारी घोषित करण्यात आले आहे. सर्व पर्यवेक्षिका, प्रकल्प्प कर्मचारी, अंगणवाडीसेविका व मदतनिस यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, महिला व बालकल्याण समिती सभापती शितल गव्हाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. पवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी यु. डी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)