विहान डायरेक्ट सेलिंग कंपनी विरोधात १६०० पानांचे दोषारोपपत्र, बँकेतील ३० लाख रुपये गोठवले
By सुमित डोळे | Updated: August 11, 2023 19:36 IST2023-08-11T19:36:07+5:302023-08-11T19:36:11+5:30
ग्रुप चॅट, सेमिनारचे व्हिडिओ ठरले सबळ पुरावे

विहान डायरेक्ट सेलिंग कंपनी विरोधात १६०० पानांचे दोषारोपपत्र, बँकेतील ३० लाख रुपये गोठवले
छत्रपती संभाजीनगर : कंपनीत ठराविक रक्कम भरुन भागीदारांना झटपट श्रीमंत होण्याच्या भुलपाथापा मारुन विहान डायरेक्ट सेलिंग (इंडिया) प्रा. लि. या कंपनीने तीन वर्षांपुर्वी राज्यभरात शेकडो लोकांना कोट्यावधीला गंडवले. शहरात अशा १४ जणांची ३५ लाख ९६ हजार ७७० रुपयांची फसवणूक झाली होती. तीन वर्षानंतर पोलिसांचा यात तपास पुर्ण होऊन गुन्हा सिध्द करुन सबळ पुराव्यांनिशी कंपनीच्या संचालक, आरोपीं विरोधात १६०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे आहे.
कल्याण इंगळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीचे कॉस्मोटीक क्रिम, इलेक्ट्रॉनिक, टुरिज्म, घडाळ, ज्वेलरी, अशा विविध प्रकारचे उत्पादने खरेदी करायचे. खरेदीदार कंपनीचा भागीदार होऊन त्यावर ठराविक पॉईंट मिळणार व परतावा सुरू होणार. खरेदी विक्री जरी नाही केली तरी ०.२५ टक्के व भागीदार दिल्यास उत्पादनाच्या १४ टक्के रक्कम नफ्याचे आमिष दाखवले होते.याप्रकरणात कंपनीचे संचालक मोहम्मद इम्तियाज मोहम्मद ईकबाल, दिलीपराज द्वारका पुक्केल्ला, रोहित देशपांडे, ऋता देशपांडे, मुंबईचे बीजी प्रशांत चांदोरकर उर्फ बीजी भास्करन, प्रशांत अशाेक चांदोरकर, सुमंत कुलकर्णी, धनंजय देशपांडे, हेमंत भिसे, दिपिका भिसे, ज्ञानेश्वर उर्फ अंकुश रिंढे, अजिंक्य कवठेकर, अक्षय कुलकर्णी, सारंग लहुळकर, गौरव गालफाडे, विशाल समिंद्रे, रामेश्वर झिने, मयुरा गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ग्रुप चॅट, सेमिनारचे व्हिडिओ ठरले सबळ पुरावे
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, प्रभाकर राऊत, संजय जारवाल यांनी तपास पुर्ण केला. देशभरात वीस पेक्षा अधिक याप्रकरणात गुन्हे दाखल झाले. सर्वाधिक पंजबाब, हरियाना, तेलंगणात नागरिक फसले गेले होते. गुंतवणूकदारांकडून फसवूण खरेदीच्या नावाखाली सह्या घेतल्या होत्या. जारवाल यांनी मात्र दुप्पट परताव्याचे आमिष दाखवणारे व्हॉट्स ऍप, टेलिग्राम ग्रुप चॅट, सेमिनारचे व्हिडिओ मिळवून फसवणूक सिध्द केली. शिवाय, कंपणीच्या बँक खात्यातील ३० लाख रुपये रक्कम गोठवून आय ऍक्ट चे कलम देखील वाढवले.