१५ तहसीलदारांच्या बदल्या
By Admin | Updated: July 23, 2016 01:17 IST2016-07-23T00:30:50+5:302016-07-23T01:17:17+5:30
औरंगाबाद : तहसीलदारांच्या बदल्या करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी शुक्रवारी विभागातील पंधरा तहसीलदारांच्या बदल्या केल्या.

१५ तहसीलदारांच्या बदल्या
औरंगाबाद : तहसीलदारांच्या बदल्या करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी शुक्रवारी विभागातील पंधरा तहसीलदारांच्या बदल्या केल्या.
औरंगाबाद ग्रामीणचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांची औरंगाबादच्या अतिरिक्त तहसीलदारपदी (शहर) बदली करण्यात आली आहे. अर्धापूरचे (जि. नांदेड) तहसीलदार सतीश सोनी यांची औरंगाबादचे (ग्रामीण) तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार विजय राऊत यांच्याकडे अतिरिक्त तहसीलदारपदाचा पदभार होता.
संजय गांधी निराधार योजना विभागाच्या तहसीलदार सुमन मोरे यांची वैजापूरच्या तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक महेश सुधळकर यांची बदनापूरच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. बदनापूरचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांची सुधळकर यांच्या जागी बदली करण्यात आली आहे. वडवणीचे (जि. बीड) तहसीलदार राजीव शिंदे यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख लिपिक म्हणून बदली करण्यात आली आहे. खुलताबादचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांची मानवत (जि. परभणी) येथे बदली करण्यात आली आहे. माजलगावचे तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांची खुलताबादचे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे.
उमरग्याचे तहसीलदार अरविंद बोलगे, लातूरच्या धान्य खरेदी अधिकारी राजश्री मोरे, परतूरचे तहसीलदार विनोद गुंडमवार, नांदेडचे महसूल सहायक सुरेश घोळवे, उमरीच्या तहसीलदार सुरेखा स्वामी आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तहसीलदारांच्या बदल्या करण्याचे अधिकार यापूर्वी महसूल मंत्र्यांना होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जून रोजी हे अधिकार विभागीय आयुक्तांना प्रदान केले. आठ तहसीलदारांच्या बदल्या करून विभागीय आयुक्तांनी पहिल्यांदाच हा अधिकार वापरला.