ठाण मांडलेले १४२ पोलीस बदलीच्या ठिकाणी रूजू
By Admin | Updated: November 26, 2014 01:08 IST2014-11-26T00:33:23+5:302014-11-26T01:08:21+5:30
जालना : पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी बदली केल्यानंतरही ठाणे प्रमुखांच्या आशिर्वादामुळे ठाण मांडून बसलेले तब्बल १४३ पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले.

ठाण मांडलेले १४२ पोलीस बदलीच्या ठिकाणी रूजू
जालना : पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी बदली केल्यानंतरही ठाणे प्रमुखांच्या आशिर्वादामुळे ठाण मांडून बसलेले तब्बल १४३ पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात ही परिस्थिती होती. परिक्षेत्र पोलिस महासंचालक अमितेषकुमार यांच्या दणक्यामुळेच हा चमत्कार घडला.
सिंह यांनी जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या. जवळपास पोलिस ठाण्यांमध्ये काही कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठांची दिशाभूल करून बदली टाळत होते. पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेली मजबूत पकड करून आरोपींशी संधान साधणारे काही पोलिस कर्मचारी गरज नसतांनाही अधिकाऱ्यांशी संधान साधून टिकून होते.
सदर बाजार, कदीम जालना, तालुका जालना, वाहतूक शाखा या ठिकाणी अनेक कर्मचारी तळ ठोकून होते. एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जिल्ह्यात झालेल्या बदल्यांना मूळमाती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रकाराला खिळ बसली आहे. आता बहुतांश पोलिस ठाण्यांमध्ये भविष्यात चांगले काम होऊ शकेल. (प्रतिनिधी)४
अमितेषकुमार यांनी पोलिस मुख्यालयासह पोलिस वसाहतीमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी आदेशही दिले आहेत. वसाहतीमध्ये नागरी सुविधांसाठी उपाय योजनाही सुचविण्यात आल्या आहेत. पोलिस वसाहत व मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या परसबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
४जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांचे प्रमुख व विभाग प्रमख यांची बैठक घेऊन अमितेषकुमार वर्षभरात दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला. तपास कामाची गती वाढविण्याचे ठाणे प्रमुखांना आदेश दिले आहेत. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी वारंवार सूचना करून ठाण्यांच्या कारभारात केलेल्या सुधारणांची दखल घेतली. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला.