शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

१४१ फुकट्या प्रवाशांना दंड

By admin | Updated: December 31, 2015 13:49 IST

विनातिकीट बसमधून प्रवास करणार्‍यांना आळा बसावा; व एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे

 

हिंगोली : विनातिकीट बसमधून प्रवास करणार्‍यांना आळा बसावा; व एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून त्यासाठी राज्यभरातील विविध विभागीय कार्यालयातंर्गत पथकाद्वारे कारवाई करण्यात येते. हिंगोलीसह आठ डेपोचे कामकाज परभणी येथील विभागीय कार्यालयातंर्गत सुरू असून १ एप्रिल ते नोव्हेंबर २0१५ अखेर पथकाने १४१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्यासह वाहकांकडून २४ हजार ६४ रूपये दंड वसूल केला आहे. एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या जास्त असली तरी, आगाराच्या उत्पन्नात घट होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कामचुकार अधिकारी-कर्मचारी तसेच विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशांमुळे आगारास आर्थिक तोटा सहन करावा लागतो. राज्य परिवहन मंडळाकडून याला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने विनातिकीट प्रवासी करणारे तसेच दोषी वाहकांवर कारवाई केल्या जात आहे. परभणी विभागीय कार्यालयातंर्गत जवळपास ७00 च्यावर चालक व वाहकांची संख्या आहे. त्यांच्यावर चार पथकाद्वारे नियंत्रण ठेवल्या जात आहे.  यासाठी रात्रीच्यावेळी २ तर दोन तर दिवसा दोन पथके कार्यरत असतात. एका पथकात पाच ५ अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असणे आवश्यक आहे. परंतु एका पथकामध्ये केवळ तीन अधिकारी-कर्मचार्‍यांचा सामावेश आहे. परिणामी, कामे गतीने होत नाहीत.  ५0 रूपये तिकीट रकमेच्यावर जर एखाद्या प्रवाशाने विनातिकीट बसमधून प्रवास केल्यास त्याला १0२ रूपये दंड व तिकिटाची पूर्ण रक्कम वसूल केल्या जाते. तर वाहकाला कारवाईचे स्वरूप लक्षात घेत दंड तसेच सहा महिने किंवा एका वर्षासाठी सेवेतून काढून टाकल्या जात असल्याची माहिती विभागीय कार्यालयाने दिली. परभणी कार्यालयातंर्गत हिंगोली, पाथरी, कळमनुरी, गंगाखेड, वसमत, परभणी यासह विविध डेपाचा कारभार चालतो. त्यांतर्गत वरीलप्रमाणे कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)/ अतिक्रमण काढणार हिंगोली बसस्थानक परिसरातील लवकरच अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडे २९ डिसेंबर २0१५ रोजी स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी संरक्षण मागण्यात आले होते. परंतु ही तारीख पुढे ढकलली असून लवकरच अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती आगारातील संबधित अधिकार्‍याने दिली.

विनातिकीट प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास न करता त्यांनी राज्य परिवहन मंडळास सहकार्य करावे. तसेच वाहकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्तव्यावर हजर असताना बसमधील प्रत्येकाला तिकीट देण्याचे काम करणे अपेक्षित आहे. जेणेकरून एसटीच्या उत्पन्नात घट होणार नाही. तसेच प्रवाशांनीही वाहकांकडून आवश्यक अंतराचे तिकीट घेणे बंधनकारक आहे, असे विभागीय वाहतूक अधिकारी डी. बी. कसबे यांनी सांगितले.