शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

औरंगाबादमधील १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; Tik Tokवर होती सक्रिय

By मुकेश चव्हाण | Published: March 03, 2021 10:33 AM

संजीवनी ऊर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.  

औरंगाबाद : व्हॉट्सॲपवर  आलेली आत्महत्येची व्हिडिओ क्लिप वारंवार पाहू नको म्हणून आई रागावल्याने  सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने साडीने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. आनंदनगरात ही खळबळजनक घटना घडली. संजीवनी ऊर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.  

पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की,  संजीवनीचे आई-वडील चणे-फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे  तिचे आई-वडील आणि लहान भाऊ सोमवारी सायंकाळी ६ वाजता  व्यवसायासाठी एकत्रित घराबाहेर पडले होते. रात्री नऊच्या सुमारास ते परत घरी आले. त्यावेळी बाहेरील दरवाजा बंद होता. आवाज दिला असता तिने प्रतिसाद दिला नाही. ती शेजाऱ्यांकडे अथवा मैत्रिणीकडे गेली असेल असे समजून ते घरात गेले. त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारणा केली. 

मात्र, त्यांच्याकडे ती नव्हती. लहान भाऊ घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेव्हा तेथे संजीवनीने साडीने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे त्याला  दिसले. ते पाहून तो रडतच खाली आला. तिच्या आई-वडिलांनीही ते पाहिले आणि हंबरडा फोडला. शेजारच्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन  संजीवनीला बेशुद्धावस्थेत घाटी  रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.  

टिकटॉकवर सक्रिय

संजीवनी ऊर्फ दीपाली टिकटॉकवर सक्रिय होती. तिने मैत्रिणीसोबत टिकटॉकवर अनेक व्हिडिओ बनविले होते. ती गारखेड्यातील कलावती चव्हाण शाळेत सातवीत शिकत होती. यावर्षी शाळाच सुरू न झाल्यामुळे ती घरीच होती.  

आत्महत्येचे गूढ कायम

नेहमी हसत-खेळत राहणाऱ्या संजीवनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण समजू शकले नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.आईच्या व्हॉट्सॲपवर आलेली आत्महत्येची  व्हिडिओ क्लिप ती वारंवार पाहत  होती. त्यामुळे आई तिच्यावर रागावली व  मोबाइल हिसकावून घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ती नाराज आणि शांत शांत राहत होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTik Tok Appटिक-टॉकMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू