शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साबुदाण्याची १३० पोती जप्त

By admin | Updated: May 8, 2014 00:10 IST

येरमाळा : ट्रक चालकाचा खून करून मालासह ट्रक पळविल्याच्या घटनेत पोलिसांनी मंगळवारी आणखी एका संशयितासह एक जीपही ताब्यात घेतली

येरमाळा : ट्रक चालकाचा खून करून मालासह ट्रक पळविल्याच्या घटनेत पोलिसांनी मंगळवारी आणखी एका संशयितासह एक जीपही ताब्यात घेतली असून, संशयिताच्या घरातून साबुदाण्याची १३० पोती जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १ एप्रिलच्या मध्यरात्री सेलम (तामिळनाडू) येथून निघालेला ट्रक चोराखळी पाटीजवळ येताच दरोडेखोरांनी त्यास अडवून चालक व क्लिनरला जबर मारहाण करीत मालासहित ट्रक पळविला होता. दरम्यान, ट्रकमधील दोघांना जबर मारहाण केल्यानंतर या दरोडेखोरांनी त्यांना येडेश्वरी मंदिराच्या पाठीमागे असणार्‍या पाझर तलावाजवळील विहिरीत टाकून दिले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला व एकजण वाचला. वाचलेल्या दिनेशकुमार गणेशायन यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. यात ४ मे रोजी उपळाई पाटीनजीक असणार्‍या हॉटेल दिनेशच्या पाठीमागील खोल्यात छापा टाकत ७० पोती साबुदाणा जप्त केला. तसेच हॉटेल मालक रामभाऊ हारभरे याच्यासह इतर सहा संशयितांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर सदर संशयितांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी मंगळवारी चोराखळी येथील श्याम साचणे यांच्या घरी छापा टाकला. यावेळी तेथून साबुदाण्याची ६० पोती व एम.एच. २३ टी. १००७ या क्रमांकाची स्कार्पिओ जीप तसेच श्याम साचणे यासही पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसेंदिवस या गुन्ह्यातील तपासात नवनवीन गुन्हेगार व चोरीचा माल सापडत आहे. अजूनही काही लोकांना ताब्यात घ्यावयाचे असल्याने या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे. (वार्ताहर)