सर्वरोगनिदान शिबिरात १,२५८ रुग्णांची तपासणी

By Admin | Updated: August 18, 2014 00:37 IST2014-08-18T00:29:38+5:302014-08-18T00:37:03+5:30

औरंगाबाद : (रविवारी गजानन महाराज भवन, गजानन महाराज मंदिरासमोर नि:शुल्क सर्वरोगनिदान शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले.

1,258 cases of inspection of the Surrogacy camp | सर्वरोगनिदान शिबिरात १,२५८ रुग्णांची तपासणी

सर्वरोगनिदान शिबिरात १,२५८ रुग्णांची तपासणी

औरंगाबाद : महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी, औरंगाबाद आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गजानन महाराज भवन, गजानन महाराज मंदिरासमोर नि:शुल्क सर्वरोगनिदान शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात १,२५८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आयोजित शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे, शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश बारपांडे, श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे श्रीधर वक्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटीचे अध्यक्ष विकास पाटणी, प्रकल्प प्रमुख प्रवीण भंडारी, विवेक बागरेचा, सचिव संदीप काठेड, राजेंद्र पगारिया, अतुल पाटणी यांची उपस्थिती होती. यावेळी विकास पाटणी यांच्या हस्ते शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शनप्रसंगी राजेंद्र दर्डा यांनी महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्वरोगनिदान शिबिराची स्तुती केली. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण संसार, संपूर्ण जग हे सुखी राहावे, अशी या संघटनेची आणि संघटनेतील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे. अध्यक्ष विकास पाटणी, उपाध्यक्ष शैलेश चांदीवाल, अमित काला यांनी मनोगत व्यक्त केले. उद््घाटन कार्यक्रमास ललित पाटणी, प्रमोद जैन, देवेंद्र काला, अजय शहा, पंकज फुलपगर, बबन डिडोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. शिबिरात सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी करण्यात आली. अस्थिव्यंग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ब्लडप्रेशर, मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ, पोटाचे विकार तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, व्यायाम तज्ज्ञ, अ‍ॅक्युप्रेशर तज्ज्ञ, आयुर्वेद तज्ज्ञ, चुंबकीय चिकित्सा तज्ज्ञ, तसेच अत्याधुनिक मशीनद्वारे हाडांची तपासणी इ. २२ प्रकारांची मोफत तपासणी क रण्यात आली. शिबिरात रुग्णांना औषधीदेखील मोफत देण्यात आली.
शिबिरासाठी नीलेश कांकरिया, कोषाध्यक्ष पारस कात्रेला, पूर्वाध्यक्ष मनीष बुनलिया, अनिल जैन, पूजा बागरेचा, उषा ललवाणी, सरिता भंडारी, मोनिका काठेड, संतोष गांधी, सत्यकुमार सुराणा, संजय गादिया, नरेश ललवाणी, धरम बोथरा, मयूर कटारिया, आनंद दुग्गड, नरेश ललवाणी, महावीर छल्लाणी, नरेश गादिया, आकाश मुक्कीरवार, मनोज कासलीवाल, पंकज झांझरी, जितेंद्र पाटणी, संदीप पाटणी, योगेश भाटी, संजय कांकरिया, रमेश बंब यांनी प्रयत्न केले.

Web Title: 1,258 cases of inspection of the Surrogacy camp