शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

११७ गावांत तिव्र पाणीटंचाई

By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होेत असून नागरीकांना अनेक आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ १०७ ठिकाणी अधिगृहणे करूर ११७


लातूर : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होेत असून नागरीकांना अनेक आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ १०७ ठिकाणी अधिगृहणे करूर ११७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे तर ४५ गावांत ४६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़ तरीही पाणीप्रश्न मार्गी लागत नसल्याने अनेक पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़
लातूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, अहमदपुर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर, देवणी आदी तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी २१९ गावात ३३२ ठिकाणी अधिगृहणाची मागणी करण्यात आली आहे तर १६६ गावांतील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी २०५ टँकरची मागणी करण्यात आली आहे़ टँकर व अधिग्रहणाचे प्रस्ताव मोठ्या संख्येने असतानाही पाणीटंचाईची तिव्रता लक्षात घेऊन अधिग्रहणाला व टँकरला जिल्हा परिषदेकडून मंजुरी दिली जात आहे़ लातूर जिल्ह्यातील १०५ गावातील टंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन ११७ ठिकाणी अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ ४५ गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे़
दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असल्याने अधिग्रहणे व टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना सुरु करावी, अशी मागणी जिल्हाभरातील नागरिकांतून केली जात आहे़ (प्रतिनिधी)
टंचाई निवारणासाठी ८३० वाडी-तांड्यावर १३७० उपाययोजना राबविण्यात येणार असून, यासाठी बोअर अधिग्रहण, विहिर खोलीकरण यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ७ कोटी ३० लाखाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़ या आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणाचे काम गाव पातळीवर केले जाणार असल्याचे नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी सांगितले़
४लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात ३़४५३, माकणी ७़३०५ दलघमी, तावरजा ०़६२५, रेणापूर ३़४१८, व्हटी ०़००२, तिरू ३़३२०, देवर्जन १़६३०, साकोळ ०़९९४ तर इतर प्रकल्पामध्ये ८़८९४ असा एकूण ५८़९२८ दलघमी पाणीसाठा आहे़ एकूण पाणीसाठ्यापैकी ७़२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच असल्याचे अभियंता करपे यांनी सांगितले़