शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

मराठवाड्यात १ हजार ६४ शाळांचे नुकसान; ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:07 IST

मराठवाड्यात २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागात २ हजार ७०१ किमीच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली, तर १ हजार ५०४ पुलांचे नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आठही जिल्ह्यातील सुमारे १ हजार ६४ शाळांमधील वर्ग खोल्यांचे नुकसान झाले. या शाळा दुरुस्त करण्यासाठी ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हानिहाय शाळांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून, पुढच्या आठवड्यात त्याचा अंतिम अहवाल शासनाकडे जाईल, असे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

शासनाने मंगळवारी (दि.७ ) घोषित केलेल्या ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये १० हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी असतील, असे नमूद केले आहे. त्यात शाळा दुरुस्तीसाठी रक्कम किती असेल हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

२ हजार ४३२ कोटी लागणार...मराठवाड्यात २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागात २ हजार ७०१ किमीच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली, तर १ हजार ५०४ पुलांचे नुकसान झाले. तलाव, शाळा, महावितरण, शासकीय इमारती, पाणीपुरवठा योजना, सिंचन व्यवस्था, प्रा. आरोग्य केंद्रांसह सुमारे २ हजार ४३२ कोटींची गरज विभागाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेकडे असलेल्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

विभागातील पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान ....रस्ते....... २७०१ किमी.............१११५ कोटींची गरजपूल..........१५०४.............५८६ कोटींची गरजतलाव.........२२२...........१०२ कोटींची गरजशाळा.......१०६४............४२ कोटींची गरजमहावितरण खांब.....९५६७......३१ कोटीशासकीय इमारती.......५८......८ कोटीपाणीपुरवठा योजना......३९२......१७ कोटीसिंचन व्यवस्था........३९५.......३८४ कोटीप्रा. आरोग्य केंद्र...........३५२.......१५ कोटीइतर नुकसान स्थळ..........३२१.....८९ कोटी

राजधानीतील ३२६ शाळांची पडझड....मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३२६ शाळांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली. त्यात ११६ शाळा पैठण तालुक्यातील आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ७४, सिल्लोड ३७, सोयगाव आणि कन्नड तालुक्यांत प्रत्येकी २५, तर गंगापूर १२, वैजापूरमधील १० आणि फुलंब्री तालुक्यातील सहा शाळांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडा