१०३८ गुुरुजींच्या होणार बदल्या
By Admin | Updated: May 8, 2014 23:29 IST2014-05-08T23:25:18+5:302014-05-08T23:29:26+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत ५ हजारावर गुरुजी कार्यरत आहेत.

१०३८ गुुरुजींच्या होणार बदल्या
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत ५ हजारावर गुरुजी कार्यरत आहेत. यापैकी पात्र असलेल्या गुरुजींच्या बदल्या २१ मे रोजी समुपदेशन पद्धतीने केल्या जाणार आहेत. शासन निकषानुसार जिल्हाभरातील १०३८ गुरुजींच्या बदल्या होतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. बदली प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, कोणावरही अन्याय होवू नये, पर्यायाने गुरुजींना सोईचे ठिकाण मिळावे, यासाठी मागील दोन ते तीन वर्षापासून समुपदेशन पद्धतीने बदल्या केल्या जात आहेत. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेत बदल्याची धामधूम सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने त्या-त्या विभागाकडून आवश्यक ती तयारी केली जात आहे. यावेळी जिल्हास्तरावर केवळ विनंती बदल्या केल्या जाणार आहेत. त्याही १० टक्केच्या प्रमाणात. त्यामुळे २७० गुरुजींच्या विनंतीनुसार बदल्या होवू शकतात. तालुका स्तरावर १० टक्के प्रशासकीय तर ५ टक्के विनंतीनुसार बदल्या होतील. १० टक्केच्या प्रमाणात ५०३ गुरुजींना नवीन शाळा मिळेल. तर ५ टक्के विनंती बदल्यानुसार २६५ गुरुजींच्या बदल्या होतील. समुपदेशन पद्धतीने ही बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्र.) ए.एस. उकीरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)