१०२६८ उमेदवार देणार ग्रामसेवक पदाची परीक्षा
By Admin | Updated: November 8, 2014 23:38 IST2014-11-08T23:29:54+5:302014-11-08T23:38:48+5:30
हिंगोली : २४ ग्रामसेवक पदांसाठी रविवारी ४१ केंद्रांवर १० हजार २६८ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत.

१०२६८ उमेदवार देणार ग्रामसेवक पदाची परीक्षा
हिंगोली : २४ ग्रामसेवक पदांसाठी रविवारी ४१ केंद्रांवर १० हजार २६८ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. सकाळी १० ते ११.३० दरम्यान होणाऱ्या या परीक्षेसाठी ४३१ हॉल आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी खालील केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
परीक्षेसाठी शिवाजी महाविद्यालय कोथळज रोड हिंगोली, अनसूया विद्या मंदिर, कै. विठ्ठलराव घुगे प्राथमिक शाळा गंगानगर, एसआरपीएफ कॅम्प मंगल कार्यालय, खुराणा-सावंत इंजिनियरिंग कॉलेज, आर.के. किड्स कँप इंग्लिश स्कुल, लिटील प्लॉवर इंग्लिश स्कूल, आदर्श महाविद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय, आदर्श महाविद्यालय कॅम्प, स्व. अमृतराव देशमुख अध्यापक विद्यालय, भारत प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी, सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कुल, शांताबाई मुंजाजी दराडे, भारतीय विद्यामंदिर, केंद्रीय प्राथमिक शाळा सदर बाजार, रामाकृष्णा इंग्लिश मेडीयम स्कुल, रामाकृष्णा इंग्लिश मेडियम स्कुल, जि.प. कन्या प्रशाला शाखा क्र.०१ मंगळवारा बाजार, सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, माणिक स्मारक आर्य विद्यालय, खाकीबाबा मेमोरीयल इंग्लिश स्कुल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संख्या डायट, जि.प. बहुविध प्रशाला, जि.प. बहुविध प्रशाला शिवाजी नगर, जि.प. कन्या प्रशाला, कल्याण मंडपम् मंगल कार्यालय नगर परिषद, विद्यानिकेतन इंग्लिश स्कुल, जि.प. हिंगोली कार्यालय बैठक हॉल, शिवपार्वती पोल्ट्री फीड गोदाम नं. ०१ एमआयडीसी, शिवपार्वती पोल्ट्री फीड गोदाम नं. १, २, ३ एमआयडीसी ही हिंगोलीतील केंद्र आहेत.
तसेच कळमनुरीत कै. डॉ. शंकरराव सातव कला व वाणिज्य महाविद्यालय, गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कुल, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, जि.प. प्राथमिक शाळा विकास नगर, केंब्रिज स्कुल आॅफ स्कॉलर्स, जि.प. माध्यमिक शाळा पोलीस वसाहतीतील केंद्रांचा समावेश आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ३ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. केंद्रावर पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र येवू नये, २०० मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बुथ चालू ठेवण्यास निर्बंध घातले आहेत. परीक्षार्थ्यांना केंद्रात मोबाईल, पेजमेकर, गणकयंत्र आदींवर निर्बंध घातला आहे.
(प्रतिनिधी)