शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

१०२ अंगणवाडी मदतनिसांच्या नोकरीवर येणार गदा; अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई ?

By विजय सरवदे | Updated: February 19, 2025 18:58 IST

जिल्ह्यातील १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत श्रेणीवर्धन झालेल्या सुमारे ८०० अंगणवाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीतून १०२ मदतनिसांची भरती केल्याचे रेकॉर्डवर उघड झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : जि.प. महिला व बालकल्याण विभागांतर्गत मदतनीस भरती प्रकरण अधिकाऱ्यांच्या आता चांगलेच अंगलट आले आहे. दुसरीकडे, नियमबाह्य भरती करण्यात आलेल्या १०२ मदतनिसांना देखील मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. तर, ही भरती प्रक्रिया राबविणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी शासन निर्णयान्वये जिल्ह्यातील सुमारे ८०० मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यांत झाले. मोठ्या अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस तर, मिनी अंगणवाड्यांमध्ये फक्त सेविका कार्यरत असतात. मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन झाल्यामुळे तिथे नियमानुसार जाहिरात देऊन मदतनिसांची पदे भरणे गरजेचे होते. मात्र, जि.प. महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही भरती प्रक्रिया अगोदरच्या प्रतीक्षा यादीतून राबविण्यात आली. त्यास अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर सोनवणे यांनी आक्षेप घेत थेट आयुक्तांकडे तक्रार केली. एवढेच नव्हे तर, यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांनी ८ जानेवारी २०२५ च्या पत्रान्वये थेट मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना मदतनिसांची पदे जाहिरात द्वारे भरण्याची सूचना केली. त्यानंतर आता जि.प. महिला व बालकल्याण विभागात हालचालींनी वेग घेतला. आता या विभागाने चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्याकडे सादर केली आहे.

नेमके जबाबदार कोण?जिल्ह्यातील १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत श्रेणीवर्धन झालेल्या सुमारे ८०० अंगणवाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीतून १०२ मदतनिसांची भरती केल्याचे रेकॉर्डवर उघड झाले आहे. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना कोणाच्या सूचना होत्या, जि.प. महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या भरती प्रक्रियेची माहिती नव्हती का, ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविली जात आहे का, याकडे सातत्याने संबंधित संघटनेने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. पण, त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

नियुक्तीचे आदेश रद्द करणारआयुक्तांचे पत्र प्राप्त झाले आहे. प्रतीक्षा यादीतून मदतनिसांची भरती करण्यात आली होती. भरती करण्यात आलेल्या मदतनिसांचे नियुक्ती आदेश रद्द करावे लागणार आहेत. शिवाय, प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी ‘सीईओ’ यांच्याकडे संचिका सादर केली आहे.- सुवर्णा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरzpजिल्हा परिषद