शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी १० वर्षाची सक्त मजुरी

By admin | Updated: May 31, 2014 00:33 IST

उमरगा : एका युवतीवर जबरी बलात्कार केल्याप्रकरणी एका युवकास १० वर्षे सक्तमजुरी तर त्यास सहाय्य करणार्‍या महिलेसह युवकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

उमरगा : एका युवतीवर जबरी बलात्कार केल्याप्रकरणी एका युवकास १० वर्षे सक्तमजुरी तर त्यास सहाय्य करणार्‍या महिलेसह युवकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश स़ल़पठाण यांनी शुक्रवारी सुनावली़ ही घटना १६ एप्रिल २०१२ रोजी फणेपूर (ता़लोहारा) येथे घडली होती़ अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व्ही़एस़आळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फणेपूर येथील एका युवतीस कोमलबाई तानाजी कोनाळे या महिलेने १६ एप्रिल २०१२ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास शौचास जाण्याच्या बहाण्याने बोलावून घेतलेू़ ती मुलगी व कोमलबाई कोनाळे ही गावानजीकच्या भालचंद्र अंहुरे यांच्या शेतातील उसाच्या शेतात गेल्यानंतर सुनिल अप्पाशा लकडे (वय-२२) याच्यासमोर त्या मुलीस उभा केले़ त्यावेळी इस्माईल शहानूर मुल्ला (वय-२४) हाही तेथे आला होता़ त्यावेळी कोमलबाई हिने मुलीस सुनील लकडे याच्यासोबत उसात जाण्यास सांगितले तेव्हा तिने नकार देत आई-वडिलांना सांगेन असे म्हणाली़ त्यावेळी सुनील लकडे याने तिच्या हाताला धरून उसाच्या शेतात ओढत नेले़ ती ओरडत असताना कोमलबाई व इस्माईल याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली़ तर सुनील याने तिच्यावर बलात्कार केला़ यावेळी तिघांनी ही घटना कोणास सांगितली तर तिच्यासह आई-वडिलांना जिवे मारू, अशी धमकी दिली़ यानंतर चार महिन्याने त्या मुलीस तिच्या आईने सास्तूर येथील स्पर्श रूग्णालयात दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याचे समोर आले़ याबाबत पीडित मुलीने १ आॅगस्ट २००८ रोजी लोहारा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघाविरूध्द लोहारा पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर त्या मुलीस तिच्या आई-वडिलांनी बालकाश्रमात पाठविल्यानंतर तिने मुलीस जन्म दिला़ या प्रकरणाचा तत्कालीन पोलिस उपाधीक्षक पंजाबराव भगत यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणी सुनवाईदरम्यान पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष, समोर आलेले पुरावे व अ‍ॅड़व्ही़एस़आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश स़ल़पठाण यांनी आरोपी सुनिल लकडे यास भादंवि कलम ३७६, ५०६ अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व २२ हजाराचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, तर आरोपी इस्माईल मुल्ला व आरोपी कमलबाई कोनाळे यांना बलात्कारप्रकरणी मदत केल्याबद्दल, पीडित मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भादंवि कलम ५०६, १०९ सह ३७६ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी पाच हजाराचा दंड, दंड न भरल्यास दोघांना चार महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली़ तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीस देण्याचे आदेश दिले़ (वार्ताहर)