शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

१० टन लसूण लुटल्याचा बनाव उघड; अवघ्या ६ तासांत चालक- क्लिनरसह सहाजण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 19:19 IST

अजिंठा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत बनाव उघडकीस आणत आरोपींना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.

सिल्लोड: ९ लाख रुपये किमतीच्या लसणासह ट्रक चोरीस गेल्याची तक्रार करणारेच आरोपी असल्याचे अवघ्या सहा तासांच्या तपासात पोलिसांनी उघडकीस आणले. याप्रकरणी चालक, वाहकसह ६ आरोपींना अजिंठा पोलिसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून ९ लाख रुपयांचा १० टन लसून, ट्रक आणि एक कार असा ३७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. आज दुपारी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील इंदोर येथील व्यापारी सुरेंद्र साधवानी यांनी सुमारे ९ लाख रुपये किंमतीचा १० टन लसूण ट्रकमधून ( एम एच १८ बिजी ८४६५ ) कर्नाटक येथे रवाना केला. मात्र, ट्रक चालक भोलूखान अजित खान, क्लिनर जितेंद्र चिंतामण गोलकर यांनी लसणाने भरलेला ट्रक बाळापूरजवळ चोरीस गेल्याची तक्रार अजिंठा पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता दिली. एका कारने रस्ता अडवून मारहाण करत ट्रक पळवल्याची माहिती दोघांनी दिली. मात्र, पोलिसांना यात काळेबेरे आढळून आले. उलट तपासणी केली असता इतर चार लोकांच्या मदतीने चालकाने व क्लिनरनेच ही लूट केल्याचे समोर आले. पोलिसांनी चालक भोलूखान अजित खान ( रा.खडकवणी जिल्हा खरंगोंन) , क्लिनर जितेंद्र चिंतामण गोलकर ( रा.आंबडोचर जि. खरंगोन ) यांनी दिलेल्या माहितीवरून सद्दाम खान रशीद खान, शाहरुख रशीद खान, घनशाम सोनी, रिजवान खान यांना एका ट्रकसह जळगाव येथून जेरबंद केले. मुद्देमाल धुळे आणि जळगाव येथून जप्त करण्यात आला.  

ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलावनिया,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सिल्लोड विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुनील लांजेवार यांच्या मार्गर्शनाखाली अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे,पोहेकॉ अक्रम पठाण,संदीप कोथलकर,सांडू जाधव,भागवत शेळके,विकास लोखंडे,संजय कोळी यांनी केली.

असा रचला चोरीचा बनाव दोन्ही चालक व क्लिनर यांनी खरगोन येथील सद्दाम खान रशीदखान व शारुख रशीद खान यांच्याशी हात मिळवणी केली. फरदापुर येथील हॉटेल मेवातवर ट्रक कुठे लुटायची ठरवले. त्यानुसार बाळापूर जवळील पुलावर ट्रक लुटल्याचा बनाव केला. त्यानंतर ट्रक जळगावकडे पाठवून चालक आणि क्लिनर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद