शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत विषय मंजुरीचा गुंता

By admin | Updated: December 27, 2016 01:31 IST

शुक्रवारी पार पडलेल्या येथील जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत सदस्यांच्या गोंधळामुळे सभा अर्धवट

गोंधळात पार पडलेल्या सभेतील सर्वच विषय मंजूर ! सत्ताधारी व विरोधकांचाही बोलण्यास नकार चंद्रपूर : शुक्रवारी पार पडलेल्या येथील जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत सदस्यांच्या गोंधळामुळे सभा अर्धवट गुंडाळावी लागली. विषयपटलावर असलेल्या १३ विषयांपैकी मोजक्याच विषयांवर चर्चा झाली होती. त्यामुळे एक-दोन विषयच मंजूर झाले होते. मात्र सत्ताधारी गटाकडून सर्वच विषय मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असून विरोधकही यावर भाष्य करायला तयार नाही. त्यामुळे विषय मंजूरीचा गुंता वाढला आहे. काही दिवसांतच जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक विभागाचा निधी अखर्चित आहे. आचारसंहिता लागण्यापुर्वी विकास कामांना मंजुरी देण्यासाठी व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी २३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. ही सभा वादळी ठरणार याची आधीच शक्यता होती. सभेला सुरूवात झाली तेव्हा विषयपटलावरील एक विषय वाढविल्याच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, विषय क्रमांक दोन ते तीनवर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधी जिल्हा परिषद सदस्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सभेतून बहिर्गमन केले. परिणामी सभा काही वेळातच गुंडाळावी लागली. त्या गोंधळात विषयपटलावरील सर्व विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. त्यात जिल्हा परिषद शाळांना पुरविण्यात येणाऱ्या ई-लर्निंग निविदा स्वीकृतीचा महत्त्वपूर्ण विषय होता. सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा झाली. या सभेला अनेक सदस्य गैरहजर होते. सभा संपल्यानंतर शुक्रवारच्या विशेष सभेतील सर्वच विषय मंजूर झाल्याची माहिती सत्ताधाऱ्यांकडून मिळाली. मात्र या विषयावर अधिकची माहिती देण्यास कुणीही तयार नव्हते. जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होऊ घातली आहे. काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण विषयांना केव्हा मंजुरी मिळेल हा प्रश्न असताना आधीच मंजुरी मिळाल्याच्या चर्चेने सारेच हैराण आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) अधिकारी पालकमंत्र्यांना भेटले ४शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेतील गोंधळ पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे. विशेष सभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी ‘सीईओ मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सभेतून बहिर्गमन केले होते. दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीआधीच जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना निवेदन देऊन झालेला प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्यांनीही हा प्रकार गांभीर्याने घेतल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारच्या विशेष सभेत पाच ते सहा विषय मंजूर झाले. त्यानंतर सभेत गोंधळ निर्माण झाल्याने सभा गुंडाळण्यात आली. सर्व विषय मंजुरीबाबत अजूनही कोणतीच माहिती मिळाली नाही. - डॉ. सतीश वाजूरकर काँग्रेस गटनेते, जिल्हा परिषद चंद्रपूर.