शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

युवक काँग्रेसचे ‘निषेधासन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:49 IST

राज्यातील भाजप सरकारने विकासाचे अनेक आश्वासने दिली. सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. मात्र विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण पुगलिया, एनएसयूआयचे अध्यक्ष स्वप्नील तिवारी त्यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बुधवारी अहिंसात्मक ‘निषेधासन’ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसमस्यांकडे वेधले लक्ष : आंदोलनात शहरातील युवकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील भाजप सरकारने विकासाचे अनेक आश्वासने दिली. सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. मात्र विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण पुगलिया, एनएसयूआयचे अध्यक्ष स्वप्नील तिवारी त्यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बुधवारी अहिंसात्मक ‘निषेधासन’ आंदोलन करण्यात आले.आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या हातात सरकारचे विडंबन करणारे फलक होते. अभ्यासन, घोषणासन किंवा गाजरासन, क्लीन चिटासन, वाचाळसन, महागाई आसन, बेरोजगारासन, भक्तासन, टोलासन, फसवणीआसन, धमकी आसन, अंशतासन, रॉफेलासन, मौनासन, असे लिहिलेले विडंबनात्मक फलक लोकांचे लक्ष वेधून घेत होते. फलकावरील प्रत्येक आसनाची माहिती उदाहरणासहित लोकांना सांगितल्या जात होते. भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होऊनही विकासकामे कागदावरच असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे करण पुगलिया नगरसेवक अशोक नागपूरे, देवेंद्र बेले, प्रवीण पडवेकर, दुर्गेश चौबे, स्वप्नील तिवारी, स्नेहल चालूरकर, चेतन गेडाम, प्रतीक हरणे, जुनेद शफीक व शहरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.जटपुरा गेटसमोर आंदोलनचंद्रपूर : युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवा राव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिश कोत्तावार यांच्या नेतृत्वात बुधवारी जटपुरा गेटसमोर आंदोलन करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मुलगी व जावयांच्या बँक खात्यामध्ये मेहुल चोक्शी याच्याकडून २४ लाख रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे केंद्रीय मंत्री जेटली यांनी राजीनामा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प आहेत. बेरोजगारांना रोजगार नाही. राज्यातील अनेक उद्योग बंद झाले, असा आरोप यावेळी करण्यात आला. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कत्याल, रुचित दवे, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, ईमरान खान, सुमेध चंदनखेडे, वाहिद शेख, भानेश जंगम, सुरज कन्नुर, अरविंद मडावी उपस्थित होते.