ताडोबात वाघांच्या दर्शनासाठी मोजावे लागणार तब्बल १२ हजार ६०० रूपये ! शुल्क कमी करण्याचा वनमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:21 IST2025-09-26T15:20:56+5:302025-09-26T15:21:29+5:30

Amravati : मानव-जिल्ह्यात आधीच वन्यजीव संघर्ष आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जीव गमावत असताना, त्याच जिल्ह्यातील लोकांना वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, हा दुजाभाव आहे.

You will have to pay a whopping Rs 12,600 to see tigers in Tadoba! Forest Minister warned to reduce the fee | ताडोबात वाघांच्या दर्शनासाठी मोजावे लागणार तब्बल १२ हजार ६०० रूपये ! शुल्क कमी करण्याचा वनमंत्र्यांना इशारा

You will have to pay a whopping Rs 12,600 to see tigers in Tadoba! Forest Minister warned to reduce the fee

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सफारी प्रवेश शुल्क नुकतेच वाढविण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांना आता शनिवार-रविवारसाठी कोर झोनमधील १२ हजार ६०० रूपये शुल्क मोजावे लागेल. हे शुल्क तत्काळ कमी केले नाही तर १ ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन करू, असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्राद्वारे दिला आहे.

मानव-जिल्ह्यात आधीच वन्यजीव संघर्ष आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जीव गमावत असताना, त्याच जिल्ह्यातील लोकांना वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, हा दुजाभाव आहे. जिल्ह्यातील नागरिकांना ताडोबा सफारीसाठी केवळ २ हजार ७०० रूपये वाहन शुल्क व ६०० रूपये गाईड शुल्क आकारावे. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पर्यटन हंगामापूर्वी स्थानिकांसाठी शुल्क कपातीचा निर्णय लागू झाला नाही, तर १ ऑक्टोबर रोजी ताडोबात एकही जिप्सी आत जाऊ देणार नाही. नागरिकांच्या हक्कांसाठी उभारलेले हे मोठे निर्णायक आंदोलन असेल, असेही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमुद केले आहे.
 

Web Title : ताडोबा में बाघ देखने की फीस बढ़ने पर विरोध की धमकी।

Web Summary : चंद्रपुर निवासियों को ताडोबा सफारी के लिए भारी शुल्क: सप्ताहांत पर ₹12,600। सांसद प्रतिभा धानोरकर ने वन मंत्री नाइक को 1 अक्टूबर से विरोध प्रदर्शन की चेतावनी दी, अगर स्थानीय लोगों के लिए शुल्क कम नहीं किया गया, तो ₹2,700 वाहन और ₹600 गाइड शुल्क की मांग की।

Web Title : High Tadoba tiger sighting fees spark protest threat.

Web Summary : Chandrapur residents face exorbitant Tadoba safari fees: ₹12,600 on weekends. MP Pratibha Dhanorkar warns Forest Minister Naik of protests starting October 1st if fees aren't reduced for locals, demanding ₹2,700 vehicle and ₹600 guide charges.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.