शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वसाहतीतच वेकोलि कामगारांचा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:39 IST

चंद्रपूर जिल्ह्याला ब्लॅक गोल्डचा खजिना म्हटले जाते. वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी जिल्ह्यात आहेत. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगार व अधिकाऱ्यांसाठी वेकोलिने वसाहती बांधल्या आहेत. मात्र वसाहतीच्या निर्माणानंतर वेकोलिने याकडे लक्षच दिले नाही.

ठळक मुद्देकधी देणार लक्ष? । कोट्यवधींचा नफा कमावणारे वेकोलि प्रशासन कामगारांप्रति निष्ठूर

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला ब्लॅक गोल्डचा खजिना म्हटले जाते. वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी जिल्ह्यात आहेत. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगार व अधिकाऱ्यांसाठी वेकोलिने वसाहती बांधल्या आहेत. मात्र वसाहतीच्या निर्माणानंतर वेकोलिने याकडे लक्षच दिले नाही. जिल्ह्यातील चंद्रपूर, घुग्घूस, सास्ती, धोपटाळा, दुर्गापूर, माजरी या परिसरातील वसाहतींमधील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. यातील काही इमारती तर अगदी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेक घरे पडून मोठी हानी होत आहे. असे असले तरी कोट्यवधींचा नफा कमावणारे वेकोलि प्रशासन कामगारांप्रति निष्ठूर झाले आहे. चंद्रपूर वेकोलितील कामगारांसाठी रय्यतवारी, लालपेठ, महाकाली कॉलरी या परिसरात प्लस आणि मायनस वसाहती आहेत. यातील मायनस क्वार्टरमधील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी या इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे त्या निश्चितच निर्लेखित झाल्या आहेत. घुग्घूस येथेही कामगारांच्या लोकवसाहती आहेत. त्या वसाहतमधील क्वार्टरला भेगा पडलेल्या आहेत. हे क्वार्टर केव्हा पडेल, याचा नेम नाही. त्यामुळे कामगाराचा व त्यांच्या कुटुबीयांचा जीव धोक्यात आला आहे. वेकोलि वणी क्षेत्राअंतर्गत घुग्घुस, नायगाव, निलजई, उकणी, मुंगोली, कोलगाव, पैनगंगा कोळ्सा खाणी आहेत. कामगारासाठी घुग्घुस येथे ३० वर्षांपूर्वी विविध कामगार वसाहतीमध्ये क्वार्टर बनविण्यात आले. त्यानंतर सुंदरनगर व कैलाशनगर (मुंगोली) परिसरात कामगार वसाहत आहे. सर्व मोडकडीस आल्या आहे.क्वार्टरमधूनही पाणी गळतेघुग्घुस येथील अनेक वसाहतीतील क्वार्टरच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. खिडक्या, दरवाजे तुटलेले आहे. शौचालयाचे गटर फुटले आहे. आता पावसाळ्यात तर या वसाहतीची आणखी दुर्दशा झाली आहे. अनेक इमारतींमधून पाणीही गळते, अशा तक्रारी आहेत. जुन्या इमारती असल्यामुळे घरात कोंदट आणि गुदमरुन टाकणारा वास पसरला असतो. याबाबत वारंवार कामगार तक्रारी करतात. मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते.राजुरा, भद्रावती तालुक्यातही भूमिगत व ओपनकॉस्ट कोळसा खाणी आहेत. येथेही सुमारे ४० वर्षांपूर्वी वेकोलिने कामगारांसाठी वसाहती बांधल्या आहेत. या वसाहतीमधील क्वार्टरचीही तशीच स्थिती आहे. क्वार्टरची डागडुजी करण्यात यावी, किंवा नवीन वसाहती निर्माण कराव्या, अशी मागणी कामगारांकडून व्यवस्थापनाकडे वारंवार केली जात आहे. विविध कामगार संघटनांकडेही कामगारांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र संघटनाही याकडे सध्या लक्ष द्यायला तयार नाही.वेकोलिच्या क्वार्टरमध्ये अनेकदा किरकोळ अपघात घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी सुंदरनगरमध्ये एक इमारत पडली होती. काही महिन्यांपूर्वी सुंदरनगर येथीलच एका दुमजली क्वार्टरच्या वरच्या मजल्याची गॅलरी कोसळली. अनेकदा भिंतीचे प्लॅस्टर पडले आहेत. घुग्घूस येथील कामगार वसाहतीमधील पाणी पुरवठा योजनेची वरची टाकीच कोसळली होती. राजुरा तालुक्यातील अनेक कामगार वसाहतीमधील भिंतींना तडे गेल्याचे स्पष्ट दिसून येते.