शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

यंत्राद्वारे केली जात आहेत शेतीचे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:39 AM

काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देमजुर झाले बेरोजगार : पेरणी व वखरणीसाठी केला जातो बैलांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ‘हायटेक’ शेतीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपूरी, सिंदेवाही तसेच चंद्रपूर तालुक्यात काही भागात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय असून धान तसेच कापसासाठी जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र दिवसेंदिवस शेतमजुरी वाढत असल्याने शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. चंद्रपूरसह इतर तालुक्यांमध्ये कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे. शेती कसण्यासाठी लागणाºया मजुरीने न उरकणारी कामे, दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा आधार घेत आहे. बळीराजा शेतातील कामांबरोबर शेणखत घालणे आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहे. खरीप व रबी हंगामातही पेरणीसाठी ट्रॅक्टरचा प्रयोग करताना दिसून येत आहे. केवळ पेरणी व वखरणीसाठी बैलांचा वापर केला जात आहे. परंतु यंदा पडलेल्या दुष्काळामुळे पशुधनाला कसे जपावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. बैलगाडीच्या सहाय्याने मजूर लावून अथवा सालगडी ठेवून शेताची मशागत करताना येणारा खर्च व ट्रॅक्टरच्या सहाय्याने येणाºया खर्चाचा ताळमेळ घातल्यास ट्रॅक्टरचा वापर परवडणारा आहे. परिणामी ट्रॅक्टरवाल्यांना रोजगार मिळत आहे. मात्र शेत मजुरांचे हात रिकामेच आहे. सद्या शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केल्याने मशागतीचे काम चांगले होते. तेच काम बैलाच्या सहाय्याने केल्यास कामास उशीर लागतो.बैलजोडीचे दर वाढलेदिवसेंदिवस पशुधनात घट होत असल्याने बैलजोडी महागली आहे. बैल घेणे शेतकºयांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यातच चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती