स्वामीनाथन आयोगाच्या पुढे जाऊन भाजपाचे शेतकऱ्यांसाठी कार्य - सुधीर मुनगंटीवार

By Admin | Updated: April 11, 2016 01:13 IST2016-04-11T01:13:39+5:302016-04-11T01:13:39+5:30

शेतकरी हा केंद्रबिंदू माणून भारतीय जनता पक्ष कार्य करीत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या पुढे जाऊन भाजपा शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे.

Work for BJP farmers ahead of Swaminathan Commission - Sudhir Mungantiwar | स्वामीनाथन आयोगाच्या पुढे जाऊन भाजपाचे शेतकऱ्यांसाठी कार्य - सुधीर मुनगंटीवार

स्वामीनाथन आयोगाच्या पुढे जाऊन भाजपाचे शेतकऱ्यांसाठी कार्य - सुधीर मुनगंटीवार

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : राजुरा-बामणी मार्गाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ
राजुरा : शेतकरी हा केंद्रबिंदू माणून भारतीय जनता पक्ष कार्य करीत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या पुढे जाऊन भाजपा शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे. या आयोगाच्या अनेक शिफारशीच्या समतुल्य अनेक कल्याणकारी योजना आम्ही कार्यान्वित केल्या आहे. अर्थसंकल्पच शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला असून २६ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजनेसाठी केलेली आहे. अशी माहिती राजुरा येथील पत्रकारांशी बोलताना राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सागितले.
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी कृषी गुरूकुल योजना, गाव स्मार्ट योजना, जलयुक्त शिवार योजना यासह अनेक योजना शेतकऱ्यांसाठी असून स्वामीनाथन आयोगात ज्या शिफारशी आहे. त्यापेक्षा पुढे जाऊन त्यातील शिफारशींपेक्षा चांगल्या योजना भाजपा शासनाने शेतकऱ्यासाठी आणल्या आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचे शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती पत्रकारांसोबत बोलताना दिली.
राजुरा येथील पंचायत समिती चौकात राजुरापासून बामणी पर्यंतच्या डांबरीकरणाचा शुभारंभ ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. पाच कोटी खर्च करून मे अखेरपर्यंत राजुरा-बामणी मार्ग तयार होणार आहे. याप्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व रस्ते पूर्ण करून दळणवळणाच्या सोई सुकर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक राहुल पावडे, वाघु गेडाम, भाजयुमो अध्यक्ष सचिन डोहे, अरुण मस्की, शिवाजी शेलोकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन बंडू बोडे यांनी केले. आभार बादल बेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Work for BJP farmers ahead of Swaminathan Commission - Sudhir Mungantiwar