शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिलांचाच पुढाकार

By admin | Updated: June 4, 2015 01:13 IST

कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साध्य झाले आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून हे पुढे आले आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीकुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साध्य झाले आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून हे पुढे आले आहे. मात्र या शस्त्रक्रियेत महिलांचाच पुढाकार अधिक असून पुरुष कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करीत नसल्याचे समोर आले आहे.मागील वर्षी चिमूर तालुक्यात ७९४ उद्दिष्ठापैकी ७१३ महिलांनी शस्त्रक्रिया केली तर ३९ पुरुषांनी कुटुंब नियोजनाची. ४५२४ कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ठ होते. त्यापैकी चार हजार ४०४ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यावर्षीच्या उद्दिष्ठासाठी काही शस्त्रक्रिया प्रगतीपथावर आहेत. वार्षीक उद्दिष्ठाकडे वाटचाल सुरू आहे.कुटुंब नियोजनाच्या या सर्व शस्त्रक्रिया महिलांनीच करून घेतल्या आहेत. स्त्रियांच्या मानाने पुरुष नसबंदीचे प्रमाण नगण्य आहे. तालुक्याला पुरुष नसबंदीचे उद्दिष्ठ कितीही असले तरी केवळ ५ ते १० टक्केच पुरुष नसबंदी झाली आहे. दोन अपत्यावरील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्ठ ७९४ होते. त्यापैकी ७१३ साध्य झाले आहे.चिमूर तालुक्यात सन २०१०-११ मध्ये पुरुष शस्त्रक्रिया केवळ ९२ झाल्या होत्या. २०११-१२ मध्ये ४३, २०१२-१३ मध्ये २९, २०१३-१४ मध्ये २०, तर सन २०१४-१५ मध्ये ३९ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या. एकूणच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया महिलांवरच लादली जात आहे. त्यातच दोन अपत्यावर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. सरासरी दोन अपत्यावर व पुढील शस्त्रक्रियेचे प्रमाण सरासरी १० टक्क्याच्या पुढे असले तरी त्यामध्ये कुटुंब नियोजनाची सर्व जबाबदारी पती स्वीकारत नाहीत तर पत्नीच कुंटुंब नियोजन करून घेते, असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.जिल्हा आरोग्य विभागाने पुरुष नसबंदीसाठी जनजागृती केली तरी पुरुष नसबंदीच्या आकडेवारीत फरक पडला नाही. यासाठी पुरुषामद्ये पुरुष नसबंदी विषयीचे अज्ञान, कारणीभूत आहे.पुरूष कमावत असल्याने शस्त्रक्रियेमुळे अशक्तपणा येईल या भीतीने परिवारातील वरिष्ठ व्यक्ती पुरुष नसबंदीसाठी विरोध करीत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. काही कुटुंबात गैरसमजुतीमुळेसुद्धा महिलानांच कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पुढे केले जात असल्याचे दिसून येत आहे.चिमूर तालुक्यातील मागील २०१० ते २०१५ या पाच वर्षात शासनाच्या ४ हजार ५२४ उद्दिष्ठापैकी चार हजार ४०४ शस्त्रक्रिया या महिलांवर करण्यात आल्या तर पुरुषाच्या फक्त पाच वर्षात २२३ नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुष नसबंदीचे प्रमाण नगण्य असल्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रकिया महिलावरच लादली जाते काय, हा प्रश्न या आकडेवारीवरून निर्माण होत आहे. (वार्ताहर)