चंद्रपूर: तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, दिवसभरातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 16:20 IST2021-05-19T16:20:01+5:302021-05-19T16:20:29+5:30
रजनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तेंदुपत्ता संकलनासाठी आयूध निर्माणी जंगल शिवारात गेली होती. या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांच्यावर हल्ला केला.

चंद्रपूर: तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, दिवसभरातील दुसरी घटना
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील घोट निंबाळा येथील महिलावाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज पहाटे आठ वाजता घडली. रजनी भालेराव चिकराम (वय-35, राहणार घोट), असे या महिलेचे नाव आहे.
रजनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तेंदुपत्ता संकलनासाठी आयूध निर्माणी जंगल शिवारात गेली होती. या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांच्यावर हल्ला केला. यात महिलांची पळापळ सुरू झाली. यात रजनी यांचा वाघाच्या हल्ल्यात घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना मिळताच क्षेत्र सहायक एन. वि. हनुवते चमूसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंदेवाही तालुक्यात दिवान तलाव परीसरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू -
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगांव उपक्षेञातील पेन्ढरी कोके बिटामधील दिवान तलाव परीसरात तेंदूपत्ता संकलित करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित महिलेचा मृत्यू झला. सिताबाई गुलाब चौके (रा.पेन्ढरी कोके) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.