शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’, चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका, विद्यार्थिनीची मुख्यमंत्र्यांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:24 IST

Chandrapur : दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चंद्रपूर : ‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’ अशी विचारणा करीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेऊ नका, अशी भावनिक साद ब्रह्मपुरी तालुक्यातील आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घातली आहे.२०१५ मध्ये राज्यात भाजपचे सरकार असताना औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली. या बंदीचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी निर्णय चुकीचा असल्याचे मत नोंदविले. दरम्यान, सरकार बदलताच दारुबंदी उठवण्याबाबतच्या चर्चांना वेग आला. अनेकांना दारू सुरु होण्याचे वेध लागले आहेत.दारूबंदी झाल्यानंतर समर्थक आणि विरोधक असे चित्र बघायला मिळाले. अनेक वेळा संघर्षही उद्भवतो. सरकार बदलल्यानंतर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी मागे घेण्याबाबत अनेक घडामोडी घडल्या. यामुळे जिल्ह्यात खरेच दारू सुरू होईल, अशी भीती या विद्यार्थिनीला आहे. त्यामुळे तिने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवले. दारूच्या विपरीत परिणामांची अनेक उदाहरणे तिने पत्रात दिली आहेत.दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गडचिरोलीची दारूबंदी कायम ठेवा, कलावंत-विचारवंत सरसावले

-  गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवावी, असे आवाहन राज्यातील ४० प्रमुख साहित्यिक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केले असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी दिली.

-  गडचिरोली दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. तिला ग्रामसभा व स्त्रियांच्या चळवळीचे समर्थन प्राप्त आहे. 

-  दारूबंदी उठविण्यासंदर्भात सुरू असलेला समितीचा विचार रद्द करावा आणि दारूबंदी अधिक प्रभावी करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली असल्याचे ‘सर्च’च्या वतीने कळविण्यात आले.

- आवाहन करणाऱ्यांमध्ये साहित्यिक अनिल अवचट, सतीश आळेकर, मिलिंद बोकील, रामदास भटकळ व प्रमोद मुनघाटे, कलावंतांमध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, वैज्ञानिक-प्रशासक अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल महाराज, ‘अंनिस’चे अविनाश पाटील, वनराईचे गिरीश गांधी, मेधा कुलकर्णी, मेळघाटचे डॉ. सातव, मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर, अंजली दमानिया, दिल्लीहून खासदार विनय सहस्रबुद्धे, गडचिरोली जिल्ह्यातून आदिवासी नेते देवाजी तोफा व हिरामण वरखेडे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सतीश गोगुलवार, राळेगणसिद्धीवरून अण्णा हजारे आदींनी दारूबंदीचे समर्थन केले असल्याचे डॉ. बंग यांनी कळविले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAbhay Bangअभय बंग