शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पुरूषांविरूध्द कायदा एवढा कठोर का ?

By admin | Updated: November 19, 2015 01:13 IST

१९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरूष हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री-पुरूष समानतेच्या या काळात हुंडाबळी ठरलेल्या.....

घोडपेठ : १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरूष हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री-पुरूष समानतेच्या या काळात हुंडाबळी ठरलेल्या स्त्रियांसाठी ४९८-अ हा कायदा वरदान ठरत असला तरी बऱ्याच घटनांमध्ये या कायद्याचा वापर स्त्रिया स्वत:च्या स्वार्थासाठी करीत असल्याचा आरोप भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केला आहे.भारतीय संस्कृती ही पुरूषप्रधान संस्कृती आहे. पुरूषांकडून स्त्रीवर अत्याचार होत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. लग्नातील हुंडा हे बहुतेक वेळा कारण असते. हुंडा देणे व घेणे दोन्ही चुकीचे आहे. या वाईट प्रवृत्तीवर अंकुश बसावा म्हणून सरकारने हुंडाबळी विरोधात ४९८-अ हा कायदा निर्माण केला. १९८० मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. सोबतच पत्नीच्या शारिरीक, मानसिक व लैंगीक छळाच्या घटनांना आळा बसावा म्हणून २००५ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा करण्यात आला. २००६ पासून याची अंमलबजावणी करण्यात आली.भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर म्हणतात, आम्ही हुंड्याचे समर्थन करीत नाही. तसेच प्रत्येकच स्त्री या कायद्याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करते असेही आमचे म्हणणे नाही. स्त्रीवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा ती रडून आपले म्हणणे खरे करते. मात्र, हुंडाबळीमधील खोट्या प्रकरणांमध्ये आपली व परिवाराची बदनामी होईल, या भितीपोटी पुरूष समोर येत नाहीत.पत्नीने तक्रार केल्याबरोबर लगेच पोलीस येवून पतीला व ज्यांची नावे प्रकरणामध्ये गोवल्या गेली आहेत, त्यांना अटक करून घेवून जातात. त्यांना आपले म्हणणेही मांडण्याची मुभा नसते. बऱ्याच वेळा पत्नीचे दुसऱ्या सोबत संबंध, संपत्तीचा हिस्सा किंवा अन्य कारणांसाठी खोटी तक्रार दाखल करण्यात येते. सर्वोच्च न्यायालयानेही अशा खोट्या तक्रारींसंबंधात या कायद्याला दहशतवादी कायदा असे म्हटले आहे. या कायद्यानुसार पत्नी स्वत:च्या इच्छेनुसार पतीच्या वृध्द आई-वडिलांपासून, गरोदर स्त्रिया तसेच इतर नातेवाईकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करते, अशी अनेक उदाहरणे आहेत. (वार्ताहर)जागतिक पुरूष हक्क दिन विशेषमहिलांकडून कायद्याचा होतेय गैरवापर४९८-अ या कायद्याचा गैरवापर करून पुरूषांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, समाजामध्ये बेअब्रु होईल या अवास्तव भितीपोटी पुरूष यांसारख्या खोट्या घटनांमध्ये बळी पडतात. पत्नीने तक्रार दाखल केल्याबरोबर अटक होते व परिणामी समाजाचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ही परिस्थिती बदलविण्यासाठी ४९८-अ सारखाच ४९८-ब हा पुरूषांच्या बाजूने असा कायदा तयार करण्यात यावा यासाठी मागील कित्येक वर्षांपासून संघटनेचा लढा सुरू आहे. तसेच स्त्री आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करण्यात यावा. ज्यामध्ये पुरूषांनाही आपले म्हणणे मांडता येईल, यासाठीही भारतीय परिवार बचाव संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत.