कारल्याची भाजी का केली? मुलाने फरशीवर डोके आपटून केली आईची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:52 IST2026-02-21T12:41:31+5:302026-02-21T12:52:52+5:30

Chandrapur : कारल्याची भाजी कशाला बनवली, या क्षुल्लक कारणावरून मुलाने फरशीवर डोके आपटून आईची हत्या केली.

Why did you make a vegetable out of a bitter gourd? The son killed his mother by hitting his head on the floor. | कारल्याची भाजी का केली? मुलाने फरशीवर डोके आपटून केली आईची हत्या

Why did you make a vegetable out of a bitter gourd? The son killed his mother by hitting his head on the floor.

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल (चंद्रपूर) :
कारल्याची भाजी कशाला बनवली, या क्षुल्लक कारणावरून मुलाने फरशीवर डोके आपटून आईची हत्या केली. ही संतापजनक घटना गुरुवारी (दि. १९) रात्री १० वाजेच्या सुमारास डोंगरगाव येथे घडली. सुमित्रा दशरथ पेटकुळे (६८, रा. डोंगरगाव) असे मृत आईचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा जगदीश दशरथ पेटकुले (३८) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आई सुमित्रा पेटकुळे या मुलगा जगदीश पेटकुळे याच्यासोबत राहत होत्या. गुरुवारी (दि. १९) रात्री आईने कारल्याची भाजी बनवली. तेव्हा जगदीशने 'कारल्याची भाजी का बनवली', असा प्रश्न विचारून वाद घातला. क्षुल्लक कारणाने पेटलेल्या संतापात मुलाने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तिचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत आई सुमित्रा यांचा जागीच मृत्यू झाला.

शेजारच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती देताच पोलिस डोंगरगावात दाखल झाले. आरोपी जगदीश पेटकुळे याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. किरकोळ वादातून आईचा जीव घेतल्याने डोंगरगावातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पत्नी मुलांसह माहेरी

आरोपी जगदीश हा मद्यपी व भांडखोर स्वभावाचा असल्याची गावात चर्चा आहे. जगदीशच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दोन लहान मुलांना घेऊन चार महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली. तेव्हापासून आई सुमित्रा व जगदीश हे दोघेच घरात राहत होते.

Web Title : करेले की सब्ज़ी पर बेटे ने माँ को पीट-पीट कर मार डाला

Web Summary : चंद्रपुर में करेले की सब्जी बनाने पर एक बेटे ने अपनी माँ का सिर फर्श पर पटक-पटक कर हत्या कर दी। आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है और उस पर आरोप लगाए गए हैं।

Web Title : Son Kills Mother Over Bitter Gourd Dish in Chandrapur

Web Summary : In Chandrapur, a son killed his mother by repeatedly hitting her head against the floor after an argument about her cooking bitter gourd. The accused has been arrested and faces charges.