शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
4
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
5
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
6
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
8
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
9
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
10
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
11
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
12
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
13
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
14
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
15
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
16
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
17
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
18
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
19
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
20
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...

ग्रामस्थांनी का बंद पाडले ताडोबाचे पर्यटन गेट? गावे वर्षानुवर्षे सोसत राहिली, अखेर आक्रोश जगासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:29 IST

Chandrapur : बरडघाट, पंढरपौनी, झरी ग्रामस्थांचा वन विभागाविरोधात एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर (चंद्रपूर) : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेली बरडघाट, पंढरपौनी आणि झरी ही गावे नावाने जंगलाच्या वेशीवर असली, तरी मूलभूत सुविधांच्या बाबतीत मात्र अजूनही बफर क्षेत्राच्या बाहेरच राहिली आहेत. वन्यजीवांचा सततचा त्रास, शेतसीमेवरील असुरक्षितता, रोजगाराचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे ग्रामस्थांचा संताप उसळला. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) दुपारी शेकडो ग्रामस्थांनी ताडोबा प्रकल्पातील नवेगाव बफर पर्यटन गेट बंद करून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत गेट उघडणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

ताडोबा प्रकल्पातील पुनर्वसित गावांना मोबदला, रोजगार आणि विकास योजना मिळाल्या असताना, ताडोबाच्या अगदी हाकेवर असलेली बरडघाट, पंढरपौनी व झरी ही गावे मात्र विकासाच्या रेषेबाहेरच राहिली आहेत. बरडघाट, पंढरपौनी व झरी गावांचा बफर क्षेत्रात समावेश करावा, जंगलाभोवती संरक्षणात्मक कुंपण उभारावे, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, जनावरांना चराईपास मंजुरी द्यावी, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू किंवा जखमी झाल्यास तातडीची नुकसानभरपाई द्यावी, या मागण्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष उतराव्यात, अशी ठाम भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली.

या आंदोलनाचे नेतृत्व बरडघाटचे माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, यांच्या मार्गदर्शनात हरिभाऊ रिनके, प्रभाकर दोडके, रामभाऊ मेश्राम, विलास पुसनाके, गोकुल उईके, प्रकाश रामटेके, पवन धुर्वे, हरिदास खुरसंगे, गजानन धुर्वे यांनी केले. तिन्ही गावांतील शेकडो महिला व युवक नवेगाव गेटवर उपस्थित राहून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

अनुचित घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दिनेश लबडे यांनी गेट परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. विशेष व्याघ्र संरक्षण दल, प्राथमिक कृती दल, वन कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Villagers Shut Tadoba Tourism Gate: Years of Neglect Erupt

Web Summary : Fed up with neglect, villagers near Tadoba Tiger Reserve closed the Navegaon tourism gate for five hours, demanding basic amenities, jobs, and compensation for wildlife damage. They seek buffer zone inclusion and protective fencing.
टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ